• Download App
    Modi 3.0 : खाते वाटपावर ना नितीश कुमार यांचा दबाव, ना चंद्राबाबूंचा प्रभाव; जुने मंत्री कायम ठेवत मोदींचाच रुबाब!! Neither Nitish Kumar's pressure on account allocation

    Modi 3.0 : खाते वाटपावर ना नितीश कुमार यांचा दबाव, ना चंद्राबाबूंचा प्रभाव; जुने मंत्री कायम ठेवत मोदींचाच रुबाब!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही म्हणून घटक पक्षांच्या नेत्यांचा मंत्रिमंडळावर दबाव येईल जास्तीची खाती मागितली जातील किंवा त्यांना हवे तसे फेरबदल करावे लागतील, अशा भरपूर बातम्या माध्यमांमध्ये आल्या, पण प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप करताना नितीश कुमार यांचा दबाव चालला, ना चंद्राबाबूंचा प्रभाव चालला, खाते वाटपात जुनेच मंत्री ठेवून मोदींचाच रुबाब चालला!! Neither Nitish Kumar’s pressure on account allocation

    मोदींनी आपल्या तिसऱ्या मंत्रिमंडळात राजनाथ सिंह, अमित शाह, जयशंकर, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन यांची खाती बदलली नाहीत. त्यांच्याकडे अनुक्रमे संरक्षण, गृह, परराष्ट्र, रस्ते बांधणी आणि अर्थ मंत्रालयाचीच खाती सोपवली. शिवराज सिंह चौहान यांना कृषी मंत्री करून त्यांच्याकडे विशेष जबाबदारी दिली, तर मनोहर लाल खट्टर यांच्याकडे शहरी गृह बांधणी तसेच ऊर्जा खाते सोपवून नवीन असाइनमेंट दिली. चंद्राबाबूच्या तेलगू देशांचे मंत्री राममोहन नायडू यांना नागरी हवाई वाहतूक मंत्री केले, एच. डी. कुमार स्वामी यांना पोलाद मंत्री केले.



    नितीश कुमार यांच्या जदयुला रेल्वे खाते हवे असल्याच्या बातम्या आल्या. पण प्रत्यक्षात मोदींनी अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे खाते सोपविले. जगदयूच्या रामनाथ ठाकूर यांच्याकडे कृषी राज्यमंत्रीपद सोपविले, तसेच राजीव रंजन सिंह यांच्याकडे पंचायती राज, पशु कल्याण तसेच दुग्धविकास मंत्रालय सोपविले. त्यामुळे ग्रामीण संदर्भातली नीतीश कुमार यांच्या यांची मागणी मोदींनी वेगळ्या पद्धतीने पूर्ण केली.

    मोदींनी आपल्या पद्धतीने त्यांना हवे तसे खाते बदल केले. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडचे नागरी हवाई वाहतूक खाते काढून घेऊन त्यांच्याकडे ईशान्य भारत विकास खाते सोपविले.

    मुरलीधर मोहोळ यांना तर थेट अमित शाह यांच्या नेतृत्वाखालच्या खात्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली त्यांच्याकडे सहकार राज्यमंत्रीपदाच्या कार्यभारा सोबतच नागरी हवाई वाहतूक खातेही सोपविले आहे.

    नारायण राणे यांच्याकडे असलेले लघु, सूक्ष्म आणि मध्यम मंत्रालय बिहार मधले नेते आणि माजी मुख्यमंत्री जतीन राम मांझी यांच्याकडे सोपविले आहे. आंध्र प्रदेशचे भाजपचे वरिष्ठ नेते बंडी संजय कुमार यांना देखील अमित शाह यांच्या नेतृत्वाखालच्या गृह मंत्रालयाचे राज्यमंत्री केले आहे. रामदास आठवले यांचे देखील खाते बदललेले नसून ते सामाजिक न्याय मंत्री असतील.

    Neither Nitish Kumar’s pressure on account allocation

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य