– इतिहासकाराने केली एक्सेसची मागणी!! Nehru Memorial Museum and Library
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यलढा इंग्रजांनी भारतीयांना केलेले सत्ता हस्तांतर या संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नेहरू मेमोरियल म्युझियम मधल्या पंडित नेहरूंच्या वैयक्तिक कागदपत्रांच्या तब्बल 51 पेट्या काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधींच्या ताब्यात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या कागदपत्रांच्या सुरक्षेविषयी दाट संशय तयार झाला आहे. एका इतिहासकाराने ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या कागदपत्रांचा एक्सेस द्यावा, अशी मागणी सोनिया गांधींना पत्र लिहून केली आहे.
याची कहाणी अशी :
सध्याचे पंतप्रधान म्युझियम आणि लायब्ररी म्हणजे जुने नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी. सोनिया गांधी या म्युझियम आणि लायब्ररीच्या सदस्य होत्या. त्यांनी नेहरूंची वैयक्तिक कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतली होती. म्युझियम मधून नेहरूंच्या वैयक्तिक कागदपत्रांच्या 51 पेट्या सोनिया गांधींच्या ताब्यात आहेत. त्या त्यांनी पंतप्रधान म्युझियम आणि ग्रंथालयाला एकतर परत कराव्यात किंवा त्याच्या प्रति उपलब्ध करून द्याव्यात किंवा या सर्व कागदपत्रांचा डिजिटल एक्सेस प्रदान करावा, अशी मागणी इतिहासकार रिजवान कादरी यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून केली आहे.
रिजवान कादरी म्हणतात :
मी सोनिया गांधींना पत्र लिहून नेहरूंची खाजगी पत्रे पंतप्रधान संग्रहालय आणि लायब्ररीला परत करण्यास सांगितले आहे, जी त्यांच्या कार्यालयाने घेतली होती, कारण त्या कुटुंबाच्या प्रतिनिधी आणि देणगीदार होत्या. या संग्रहालयातून 2008 मध्ये 51 पेट्या काढून घेण्यात आल्या होत्या.
या 51 पेट्यांमधील कागदपत्रांमध्ये फक्त पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचीच कागदपत्रे आहेत असे नाही, तर जयप्रकाश नारायण, बाबू जगजीवन राम, एडविना माऊंटबॅटन संग्रह आणि इतर अनेक संग्रहांचा समावेश आहे. एकदा दान केलेले संकलन काढता येत नाही पण ते काढले जाते. अदलाबदल केलेली पत्रे मागे घेण्यामागचा हेतू काय होता??
नेहरू आणि एडविना माउंटबॅटन यांच्यातला पत्रव्यवहार हे मूळ देणगीदाराने म्हणजेच खुद्द नेहरूंनी संस्थेला दिले होते. त्यात काही आक्षेपार्ह गोष्ट होती का??, हा संग्रह परत घेण्यामागचा हेतू काय होता?? सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात मी विचारले आहे.
सोनिया गांधी यांनी ताब्यात घेतलेल्या 51 पेट्यांमधली सर्व कागदपत्रे PMML ला परत करावीत किंवा त्याची एक प्रत आम्हाला द्यावी. मला खात्री आहे की या अमूल्य दस्तऐवजांचे संरक्षण करण्यासाठी हे सद्भावनेने मी त्यांची मागणी केली आहे. कारण माझ्यासारख्या इतिहासकारांना त्यांचा मागोवा घेण्यात खूप रस आहे.
सोनिया गांधींनी संबंधित कागदपत्रांमधील स्कॅन केलेल्या प्रती आम्हाला उपलब्ध करून द्याव्यात किंवा त्या आम्हाला त्यांची जागा सुचवू शकतील जिथे आम्ही बसून संशोधन करू शकतो. देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या कालखंडा संदर्भातील ही कागदपत्रे आणि त्यातल्या नोंदी सुरक्षित राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 51 पेट्यांमधील सर्वच्या सर्व महत्वाची कागदपत्रे गहाळ होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी त्यांचे फॉरेन्सिक ऑडिट केले पाहिजे.
Nehru Memorial Museum and Library
महत्वाच्या बातम्या
- Narendra Modi अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पंतप्रधान मोदींचे केले जोरदार स्वागत
- Eknath Khadse : एकनाथ खडसे यांचे खुलासा, भाजप प्रवेशाचे गणपतीसह विसर्जन, मी आता राष्ट्रवादीतच राहणार!
- International Coastal Cleanup Day : आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनानिमित्त जुहू किनाऱ्यावर स्वच्छता अभियान
- Mohammed yunus : हिंदूंवरच्या अत्याचाराबाबत उत्तरे देण्याच्या भीतीपोटी मोहम्मद युनूस यांनी अमेरिकेत टाळली मोदींबरोबरची बैठक!!