• Download App
    नेहरूंनी आरक्षण विरोधात मुख्यमंत्र्यांना लिहिले होते पत्र; पंतप्रधान मोदींचा राज्यसभेतून हल्लाबोल!! Nehru had written a letter to the Chief Minister against reservation

    नेहरूंनी आरक्षण विरोधात मुख्यमंत्र्यांना लिहिले होते पत्र; पंतप्रधान मोदींचा राज्यसभेतून हल्लाबोल!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान पंडित नेहरूंवरचा हल्लाबोल आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत आणखी प्रखर केला. लोकसभेतील भाषणाच्या वेळी त्यांनी पंतप्रधान नेहरूंच्या चुकांचा पाढा वाचलाच होता, तो पुढे नेत मोदींनी आज पंतप्रधान नेहरूंना आरक्षण विरोधी ठरवले. पंडित नेहरूंनी आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात भारतीयांना आळशी म्हटले होते. इतकेच नाही तर त्यांनी नोकऱ्यांमधील आरक्षणा विरोधात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते, याची आठवण मोदींनी राज्यसभा सदस्यांना आणि देशाला करून दिली. Nehru had written a letter to the Chief Minister against reservation

    “मला कोणत्याही प्रकारचे आरक्षण मान्य नाही. त्यातही विशेषतः नोकऱ्यांमधले आरक्षण तर मला अजिबात मान्य नाही कारण नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिल्यामुळे अकुशलतेला प्रोत्साहन मिळते आणि त्यामुळे दुय्यम दर्जाच्या सेवा मिळतात”, असे पंडित नेहरूंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते. याचा अर्थ काँग्रेस मूळातच आरक्षण विरोधी आहे, हे सिद्ध होते, असे टीकास्त्र पंतप्रधान मोदींनी सोडले.

    ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी एकाच परिवाराला भारतरत्न दिले. बाबासाहेब आंबेडकरांना देखील भारतरत्न देण्याच्या योग्यतेचे ते समजले नाहीत. ते काँग्रेसचे नेते आमच्या सरकारला ओबीसी आरक्षणाचा उपदेश करतात, पण मूळात काँग्रेसच ओबीसी आणि दलित विरोधी आहे, असा आरोपही पंतप्रधान मोदींनी केला.

    काँग्रेसच्या व्हीआयपी कल्चरबाबतही मोदींनी अनेक प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, काँग्रेसने येत्या निवडणुकीत 40 जागा जरी जिंकल्या तरी भरपूर होतील, ते आज आपल्या चुकांची शिक्षा भोगत आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार मानताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

    पंतप्रधानांनी यापूर्वी सोमवार, 5 फेब्रुवारी रोजी लोकसभेला संबोधित केले होते. आज राज्यसभेत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवातीपासूनच काँग्रेसवर हल्लाबोल करताना दिसले. पंतप्रधान म्हणाले की, काही लोकांवर टीका करणे हा नाईलाज झाला आहे आणि त्याबद्दल मी त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करतो असं म्हणत पंतप्रधान काँग्रेसकडे बोट दाखवत होते.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘मी मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाषण लक्षपूर्वक ऐकत होतो आणि मला त्याचा खूप आनंद झाला. लोकसभेत जी मनोरंजनाची उणीव होती, ती तुम्ही पूर्ण केली. खर्गे इतके बोलू शकले, कारण त्या दिवशी ते बोलत होते, तेव्हा त्यांचे दोन कमांडर राज्यसभेत बसले नव्हते. खर्गे त्या दिवशी म्हणाले होते की एनडीए देशात 400 जागा जिंकेल.

    बाबासाहेबांचे विचार नष्ट करण्याचा प्रयत्न

    माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणाचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांनी नोकऱ्यांमधील आरक्षणाला विरोध केला होता आणि नेहरूंचे भाषण आणि त्यांचे शब्द काँग्रेससाठी मौल्यवान आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नष्ट करण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. सीताराम केसरी यांच्याशी काँग्रेस पक्षाने ज्या प्रकारे वागणूक दिली ते त्यांच्या नजरेत ओबीसींचे महत्त्व दाखवण्यासाठी पुरेसे आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. आपल्या भाषणादरम्यान, पीएम मोदींनी एनडीए सरकारने एससी, एसटी आणि ओबीसींसाठी केलेल्या विकासकामांची देखील गणना केली.

    काँग्रेस पक्षाच्या आजच्या स्थितीला काँग्रेस पक्षच जबाबदार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आगामी निवडणुकीत काँग्रेसला 40 जागाही मिळाल्या तर ती त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 40 जागाही वाचवणे कठीण होणार आहे.

    Nehru had written a letter to the Chief Minister against reservation

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के