Tuesday, 6 May 2025
  • Download App
    नीट-यूजी परीक्षेमध्ये फसवेगिरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मास्टरमाइंडसह 8 जणांना अटक|NEET-UG exam cheating racket busted, 8 arrested including mastermind

    नीट-यूजी परीक्षेमध्ये फसवेगिरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मास्टरमाइंडसह 8 जणांना अटक

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : सीबीआयने रविवारी झालेल्या नीट-यूजी परीक्षेतील बनावटगिरीच्या मोठ्या रॅकेटचा भंडाफोड केला. या प्रकरणात मास्टरमाइंडसह 8 जणांना अटक केली. सीबीआयने दिल्ली, फरिदाबादसह अनेक ठिकाणांवरून ही अटक केली.NEET-UG exam cheating racket busted, 8 arrested including mastermind

    प्राथमिक चौकशीनुसार, हे रॅकेट परीक्षार्थींच्या जागेवर दुसऱ्यांना बसवून परीक्षा देण्याचे होते. मास्टरमाइंड सुशील रंजन गौतमनगर दिल्लीचा रहिवासी आहे. परीक्षेचे आयोजन राष्ट्रीय परीक्षा संस्थेने केले होते. एफआयआरनुसार, रविवारी झालेल्या परीक्षेत दिल्ली आणि हरियाणातील अनेक केंद्रांवर खऱ्या विद्यार्थ्यांच्या जागी इतरांनी परीक्षा दिल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती. रॅकेटमध्ये सहभागी लोक खऱ्या विद्यार्थ्यंाकडून पैसे घेऊन पेपर सोडवणाऱ्याची व्यवस्था केली होती.



    यासोबत विद्यार्थ्याचे ओळखपत्र आणि पासवर्ड जमा करून इच्छित केंद्र प्राप्त करण्याचेही सेटिंग केले. रॅकेटमध्ये सहभागी लोकांनी फोटो मिक्सिंग आणि मॉर्फिंगच्या माध्यमातून बनावट उमेदवार बसवले. सीबीआयने या प्रकरणात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    परीक्षा केंद्राबाहेर मास्टरमाइंडला केली अटक

    सीबीआयने मास्टरमाइंड सुशील आणि निधी यांना दिल्लीच्या हॅवलॉक स्क्वेअर परीक्षा केंद्राबाहेर अटक केली. जीपू लालला कुंदन कॉलनी बल्लभगड सेंटरमधून आणि रघुनंदनला सीनियर सेकंडरी स्कूल पटपडगंज दिल्लीतून, भरत सिंहला सफदरजंगच्या वसतिगृहातून आणि सौरभला सरकारी विद्यालय, शकूरपूर, नवी दिल्ली येथील सेंटरमधून पकडण्यात आले.

    NEET-UG exam cheating racket busted, 8 arrested including mastermind

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Mock drill च्या वेळी सरकारी यंत्रणा सांगेल तसेच वागा, Black out बघायला बाहेर पडू नका!!

    P Venkat Satyanarayana : आंध्र प्रदेशात राज्यसभा पोटनिवडणुकीत भाजप नेते पी. वेंकट सत्यनारायण विजयी

    AI : ७६ टक्के भारतीयांचा AIवर विश्वास, जागतिक सरासरी ४६ टक्क्यांपेक्षा खूपच जास्त – रिपोर्ट