विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नीरजला चोप्राने टोकियोत कमाल करून सुवर्ण पदक मिळताच त्याचे इंस्टाग्राम अकाउंटवरील फॉलोअर्स मिनिटाला दीड ते २ हजाराने वाढत गेलेले दिसत आहेत, तर ट्विटर अकाउंटवरही फॉलोवर्स वाढत गेले आहेत. Neeraj chopra’s social media following increases in leaps and bound
टोकियो ऑलिम्पिकच्या अंतिम टप्प्यात नीरज चोप्राने भारतीयांच्या पदरात सुवर्ण पदकाची भर टाकून ऑलिम्पिकमधील भारताची अनेक वर्षांची सुवर्ण पदकाची प्रतीक्षा संपवली. ज्या क्षणी नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्ण पदक पटकावले त्याच क्षणी नीरज चोप्रावर भारतभरातून कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. तसेच नेटिझन्सनीही नीरज चोप्राच्या सोशल मीडियाच्या अकाउंटला उचलून धरले. नीरजला सुवर्ण पदक मिळताच त्याचे इंस्टाग्राम अकाउंटवरील फॉलोअर्स मिनिटाला दीड ते २ हजाराने वाढत गेले, तर ट्विटर अकाउंटवरही फॉलोअर्स वाढत गेले.
– नीरजचे १५ नोव्हेंबर २०१७ रोजीचे ट्विट नेटिझन्सनी उचलून धरलेय!
नीरजने १५ नोव्हेंबर २०१७ रोजी जे ट्विट केले होते, ते ट्विट आकर्षक वाटले. त्यामध्ये नीरज चोप्राने म्हटले होते की, “जब सफलता की ख्वाहिश आपको सोने ना दे… जब मेहनत के अलावा कुछ अच्छा ना लगे… जब लगातार काम करने के बाद थकावट ना हो… समझ लेना सफलता का नया इतिहास रचने वाला है…!!” हेच ट्विट नेटिझन्सनी उचलून धरले आहे.
नीराजच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव केला आहे. कालपर्यंत भारतीयांना विशेष परिचित नसलेला नीरज चोप्रा त्यानंतर काही तासांत कोट्यवधी भारतीयांचा लाडका बनला आहे. नीरजचे २ तासांत ट्विटरवर तब्बल १३ हजार फॉलोअर्स वाढले आहेत.
Neeraj chopra’s social media following increases in leaps and bound
महत्त्वाच्या बातम्या
- आता भारतात मिळणार सिंगल डोस कोरोना लस, जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला आपत्कालीन वापराची मंजुरी
- Raj Kundra Case : शर्लिन चोप्राचा खुलासा, राज कुंद्रा म्हणाला होता की, शिल्पाला माझे व्हिडिओ आवडतात !
- मद्याच्या महसुलातून दिल्ली सरकारची बंपर कमाई, 20 झोनच्या वाटपातून 5300 कोटींचे घसघशीत उत्पन्न
- Tokyo Olympics : भारतीय गोल्फरने पदक गमावले, पण मने जिंकली; पंतप्रधान मोदी म्हणाले – ‘वेल प्लेड अदिती’
- Raj kundra case : राज कुंद्राची याचिका हायकोर्टाने फेटाळली, अटक बेकायदेशीर असल्याचे दिले होते आव्हान