• Download App
    Neelam, who was arrested in the Parliament intrusion, was involved in the separatists' farmers' movementename%

    संसद घुसखोरीत अटक झालेली नीलम सामील होती फुटीरतावाद्यांच्या शेतकरी आंदोलनात; चौघांच्या कारस्थानाचा उलगडा!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : संसदेतली सुरक्षाभंग करून लोकसभेत प्रेक्षक गॅलरीतून उडी मारून घुसखोरी करणाऱ्या कारस्थानाचा टप्प्याटप्प्याने उलगडा होत असून चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्यांपैकी एक महिला नीलम ही दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनात सामील झाल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. नीलम उच्चशिक्षित असून ती हरियाणातल्या जींदची रहिवासी आहे. ती दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनात सामील झाल्याची माहिती तिच्या भावानेच दिली. Neelam, who was arrested in the Parliament intrusion, was involved in the separatists’ farmers’ movement

    हे तेच शेतकरी आंदोलन होते, जे खलिस्तानी फुटीरता वाद्यांनी हायजॅक केले होते. त्यांनी दिल्लीची कोंडी करून संपूर्ण देश भेटीला धरला होता आंदोलनाच्या नावाखाली लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडा फडकवण्याचाही प्रयत्न केला होता. या आंदोलनाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बाकीच्या विरोधकांचा पाठिंबा मिळाला होता. या आंदोलनात नीलम सामील झाल्याची माहिती मिळाल्याने संसद घुसखोरी प्रकरणास वेगळे वळण लागले आहे. पोलीस विविध अँगलमधून त्या गोष्टीचा तपास करीत आहेत.

    संसदेत घुसखोरी करून प्रेक्षक गॅलरीतील लोकसभेत उडी मारणारे दोन तरुण बाहेर असलेले एक महिला आणि एक तरुण या चौघांची ओळख पटली असून दोन तरुणांची नावे सागर शर्मा आणि डी. मनोरंजन (३५) अशी आहेत, तर संसदेबाहेर नीलम (४२) आणि अमोल शिंदे (२५) या दोघांना पोलिसांनी पकडले. संसदेबाहेर नीलम आणि अमोल शिंदे या दोघांनी “तानाशाही नहीं चलेगी (हुकुमशाही चालणार नाही), मणिपूरवासीयांना न्याय द्या. महिलांवरील अत्याचार सहन करणार नाही. भारत माता की जय, हुकुमशाही बंद करा. जय भीम, जय भारत, वंदे मातरम.” अशा घोषणा दिल्या. यापैकी नीलम ही दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात सामील झाली होती.

    नीलम ही हरियाणामधील जींद जिल्ह्यातील घासो गावातली रहिवासी आहे. तिच्या वडिलांचं मिठाईचे दुकान आहे. अमोल शिंदे हा महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातला रहिवासी आहे. नीलम आणि अमोल हे दोघे संसदेबाहेर घोषणा देत होते, तर डी. मनोरंजन हा कर्नाटकचा रहिवासी असून तो ऑटोरिक्षा चालवतो. या चौघांचा म्होरक्या असलेला सागर शर्मा हा उत्तर प्रदेशची राजधानी लखनौचा रहिवासी आहे. या चौघांनी काही दिवसांपूर्वी संसदेत घुसखोरी करण्याचे कारस्थान रचले होते.

     सागर, मनोरंजनला खासदारांचा चोप

    या चौघांची चौकशी आणि तपास सुरू असून खासदार आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी सागर आणि मनोरंजन यांना चोप दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या चौघांच्या कारस्थानाचा उद्देश आणि त्यांच्या मागचे मास्टर माईंड या संदर्भात पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी कसून चौकशी करत आहेत. दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांचे या चौकशी आणि तपासावर नियंत्रण आहे.

    Neelam, who was arrested in the Parliament intrusion, was involved in the separatists’ farmers’ movement

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही