• Download App
    पोलंडजवळ युक्रेनच्या लष्करी तळांवर डागली ३० क्षेपणास्त्रे; ३५ जणांचा मृत्यू, शेकडो जखमी । Near Poland in Ukraine Rashiyan fired 30 missiles; 35 Died, hundreds of injured

    पोलंडजवळ युक्रेनच्या लष्करी तळांवर डागली ३० क्षेपणास्त्रे; ३५ जणांचा मृत्यू, शेकडो जखमी

    वृत्तसंस्था

    मॉस्को : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आता आणखीनच भडकले आहे. पोलंडजवळ युक्रेनच्या लष्करी तळांवर रशियाने ३० क्षेपणास्त्रे डागली. त्यात; ३५ जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी जखमी झाल्याचे वृत्त आहे. Near Poland in Ukraine Rashiyan fired 30 missiles; 35 Died, hundreds of injured



    रशियन सैन्य नाटो सदस्य पोलंडच्या सीमेपर्यंत पोहोचले आहेत. पश्चिम युक्रेनमध्ये पोलंडच्या सीमेपासून ३५ किमी दूर यावाेरिव्ह लष्करी तळावर रशियाने ३० क्षेपणास्त्रे डागली. यात ३५ जणांचा मृत्यू झाला, तर शंभरावर जखमी झाले. या तळावर नाटो लष्कराला प्रशिक्षण दिले जाते. पश्चिमेतील लष्करी शिपमेंटला निशाणा बनवण्याची धमकी रशियाचे परराष्ट्र उपमंत्री सर्गेई रायबकाेव्ह यांनी दिली.

    अमेरिकन पत्रकार ठार झाला

    रशियन हल्ल्यांत रविवारी अमेरिकन पत्रकार ब्रेंट रेनॉड यांचा मृत्यू झाला. ते राजधानी कीव्हबाहेरील भाग इर्पिनमध्ये मारले गेले. प्रेस आयडीत ते न्यूयाॅर्क टाइम्सचे पत्रकार असल्याचे सांगण्यात आले. तथापि, न्यूयाॅर्क टाइम्सने ते आमच्यासाठी काम करत नाहीत, असे सांगितले.

    Near Poland in Ukraine Rashiyan fired 30 missiles; 35 Died, hundreds of injured

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र