• Download App
    मोठी बातमी : भारताकडून SMART क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, समुद्रात वाढणार देशाची ताकद|ndia today successfully carried out a long-range Supersonic Missile Assisted Torpedo SMART off the coast of Balasore in Odisha

    मोठी बातमी : भारताकडून SMART क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, समुद्रात वाढणार देशाची ताकद

    भारताने आज ओडिशातील बालासोरच्या किनाऱ्यावर लांब पल्ल्याच्या सुपरसॉनिक मिसाइल असिस्टेड ऑफ टॉर्पेडोज (SMART) चे यशस्वी प्रक्षेपण केले. या प्रक्षेपणानंतर, DRDO ने सांगितले की, ही प्रणाली टॉर्पेडोच्या पारंपरिक श्रेणीच्या पलीकडे, उप-सागरी विरोधी युद्ध क्षमता वाढवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ही एक प्रणाली आहे ज्यामध्ये टॉर्पेडो क्षेपणास्त्रांसह असतात.ndia today successfully carried out a long-range Supersonic Missile Assisted Torpedo SMART off the coast of Balasore in Odisha


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारताने आज ओडिशातील बालासोरच्या किनाऱ्यावर लांब पल्ल्याच्या सुपरसॉनिक मिसाइल असिस्टेड ऑफ टॉर्पेडोज (SMART) चे यशस्वी प्रक्षेपण केले. या प्रक्षेपणानंतर, DRDO ने सांगितले की, ही प्रणाली टॉर्पेडोच्या पारंपरिक श्रेणीच्या पलीकडे, उप-सागरी विरोधी युद्ध क्षमता वाढवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ही एक प्रणाली आहे ज्यामध्ये टॉर्पेडो क्षेपणास्त्रांसह असतात.

    SMART म्हणजे काय?

    SMART हे जहाजविरोधी क्षेपणास्त्राचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये कमी वजनाचा टॉर्पेडो लावला जातो. हा टॉर्पेडो पेलोड म्हणून वापरला जातो. या दोन्हीच्या सामर्थ्याने ते पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्र बनते. याच्या मदतीने यात क्षेपणास्त्राची खासियत तर येतेच, शिवाय तसेच टॉर्पेडोच्या साहाय्याने पाणबुडी नष्ट करण्याची क्षमताही येते. तथापि, त्याच्या श्रेणीबद्दल अद्याप योग्य अंदाज लावण्यात आलेला नाही. याच्या मदतीने भारतीय नौदलाची समुद्रातील ताकद आता वाढणार आहे.

    देशाकडे वरुणास्त्र नावाचा पाणबुडीविरोधी टॉर्पेडोदेखील आहे, ज्यामध्ये जीपीएसच्या मदतीने शत्रूच्या पाणबुड्यांना लक्ष्य करण्याची ताकद आहे. स्मार्टची वरुणास्त्राशी तुलना केली तर ते अगदी हलके आहे. लडाखमध्ये चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर डीआरडीओ मागच्या बऱ्याच काळापासून सक्रिय आहे.

    ndia today successfully carried out a long-range Supersonic Missile Assisted Torpedo SMART off the coast of Balasore in Odisha

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे