विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बोलवलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या बैठकीला 38 पक्षांमध्ये महाराष्ट्रातून सदाभाऊ खोत आणि महादेव जानकर यांना निमंत्रण नसल्याच्या बातम्या आले असल्या तरी या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह आमदार विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष हजर आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर आधीपासूनच एनडीएचा घटक पक्ष आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या स्वागताला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हॉटेल ताजच्या गेटवर हजर होते. NDA 38 parties meeting in delhi
राजधानी नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि सदाभाऊ खोत यांची शेतकरी आघाडी यांना निमंत्रण नाही. यापैकी महादेव जानकर यांनी आपण भिकारी नाही त्यामुळे आपण स्वतःहून निमंत्रण मागून घेऊन दिल्लीला जाणार नाही, असे सांगितले.
पण राष्ट्रीय लोकशाही आघाडीने NDA अजितदादांच्या राष्ट्रवादीला तसेच आमदार विनायक गोरे यांच्या जनसुराज्य पक्षाला बैठकीचे निमंत्रण दिल्याने अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि विनय कोरे हे राजधानी दिल्लीतल्या बैठकीला हजर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या फोटोसेशन मध्ये हे सर्व नेते हजर होते.
NDA 38 parties meeting in delhi
महत्वाच्या बातम्या
- विरोधी ऐक्यासाठी जमले होते 26 पक्ष, आज NDAच्या बैठकीला 38 पक्षांचा सहभाग
- संशयाचे पडळ घेऊन शरद पवार आज बंगलोरच्या विरोधी ऐक्याच्या बैठकीत!!
- एसबीआयचा अहवाल- महापुरामुळे देशात तब्बल 15 हजार कोटींचे नुकसान, 92 टक्के जनता विमाच काढत नाही
- दिल्लीतील अधिकारांच्या लढाईवर घटनापीठ करणार सुनावणी, सुप्रीम कोर्टाचा नायब राज्यपाल- मुख्यमंत्र्यांना मिळून काम करण्याचा सल्ला