• Download App
    NCW : राष्ट्रीय महिला आयोगाने घेतला विवाहपूर्व समुपदेशनासाठी पुढाकार; नऊ राज्यांमध्ये 22 ठिकाणी उघडली "तेरे मेरे सपने" केंद्रे!!

    NCW : राष्ट्रीय महिला आयोगाने घेतला विवाहपूर्व समुपदेशनासाठी पुढाकार; नऊ राज्यांमध्ये 22 ठिकाणी उघडली “तेरे मेरे सपने” केंद्रे!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय महिला आयोगाने आणखी एक सकारात्मक पाऊल पुढे टाकत युवक युवतींच्या विवाहपूर्व समुपदेशनासाठी पुढाकार घेतला असून आज नऊ राज्यांमध्ये 22 ठिकाणी समुपदेशन केंद्रे सुरू केली आहेत. “तेरे मेरे सपने” या अनोख्या नावाने ही केंद्रे कार्यरत होणार असून यामध्ये विवाह योग्य असलेल्या युवक युवतींना विवाहपूर्व समुपदेशन करण्याची सोय असणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली.

    आधुनिक काळात कुटुंब व्यवस्था विस्कळीत होत असताना युवक युवतींनी आपापली स्वप्ने एकत्र येऊन साकार करण्याच्या दृष्टीने विचार विनिमय करावा. आपले वैवाहिक जीवन अधिक सुकर आणि संपन्न कसे करता येईल, या संदर्भात एकत्रित विचार करून जीवनाचे आर्थिक आणि कौटुंबिक व्यवस्थापन करावे. वैवाहिक जीवनात स्त्री आणि पुरुष यांनी एकमेकांचा आदर सन्मान राखत आपले कुटुंब फुलवावे या हेतूने युवक युवतींसाठी विवाहपूर्व समुपदेशनाचे काम “तेरे मेरे सपने” ही केंद्र करतील, असे विजयाताई रहाटकर यांनी सांगितले.

    वेगवेगळ्या राज्यांच्या जेंडर बजेट संदर्भात देखील त्यांनी भाष्य केले. महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळी राज्ये आपापल्या बजेटमध्ये विशिष्ट तरतुदी करून ठोस पावले टाकत आहेत. याचे उत्तम उदाहरण उत्तराखंडच्या बजेट मधून समोर आले. त्या राज्याने महिलांसाठी बजेटमध्ये 16 टक्क्यांची वाढ केली अशीच अनेक राज्ये विचारपूर्वक पावले टाकत आहेत दिल्लीचे देखील बजेट असेच महिलांचे सक्षमीकरण करणारेच असेल कारण आता दिल्लीत एक महिला मुख्यमंत्री झाली आहे, याची आठवण विजयाताई रहाटकर यांनी करून दिली.

    NCW has launched a Marital Communication Center called ‘Tere Mere Sapne’ to promote happy marriages and respect between families.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Indo Pak ceasefire : भारताने धोरणात्मक निर्णय बदलल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात यांच्यात शस्त्रसंधी, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

    Shri Siddhivinayak Temple : श्री सिद्धिविनायक मंदिरात आता नारळ, हार अन् प्रसाद बंदी

    Marco Rubio and S Jaishankar : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी एस जयशंकर यांच्याशी केली चर्चा