नाशिक : दोन्ही राष्ट्रवादींच्या विहिरीने करण्याची चर्चा थांबविण्याचा जयंत पाटलांनी लॉलीपॉप दिला आणि त्यातून शरद पवारांच्या उमेदवारीतला अडथळा दूर करायचा “डाव” खेळला, हीच राजाकीय वस्तुस्थिती आज राज्यसभा निवडणुकीचे फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी म्हणजेच 4 मार्च 2026 रोजी समोर आली. Jayant Pati
शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारीसाठी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी कालच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना विनंती केली. त्या पाठोपाठ आज जयंत पाटलांनी विधिमंडळ परिसरात छोटेखानी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतच त्यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांना दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा थांबली असल्याचा लॉलीपॉप दिला. शरद पवारांना राज्यसभेची उमेदवारी हवी असेल, तर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन व्हायच्या शक्यतेबद्दल जाहीरपणे भूमिका सांगावी, तरच त्यांच्या उमेदवारी विषयी विचार करता येईल, असा इशारा काँग्रेस आणि शिवसेना यांनी दिला होता. शरद पवार महाविकास आघाडीचे एकमेव उमेदवार म्हणून निवडून येणार आणि नंतर भाजपला डोळा मारत बसणार, याची खात्री वाटल्यानेच काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कोंडीत पकडले होते.
– जयंत पाटलांचा कावा
जयंत पाटलांनी आज विधिमंडळ परिसरात छोटेखानी पत्रकार परिषद घेऊन दोन्ही राष्ट्रवादींची विलीनीकरण होण्याची चर्चा आता थांबली असल्याचे लॉलीपॉप दिले. अजित पवार गेल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांची भावना समजून घेणारा नेताच आता राहिला नाही. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा आता थांबली आहे. आम्ही कुणाशीही ती चर्चा करत नाही. आता विलीनीकरण होण्याची शक्यता नाही, असा दावा जयंत पाटलांनी केला. परंतु, प्रत्यक्षात अशा पद्धतीचा दावा करून त्यांनी शरद पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीतला अडथळाच दूर करायचा “डाव” खेळला.
– पवार भाजपला डोळा मारणारच नाहीत, याची गॅरंटी काय??
कारण शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा सुरूच होणार नाही, किंवा शरद पवार भाजपला डोळा मारणारच नाहीत, असा कुठलाही शब्द जयंत पाटलांनी पत्रकार परिषदेत उच्चारला नाही किंवा त्यांना तसला प्रश्न सुद्धा कुठल्याही पत्रकाराने विचारला नाही.
– काँग्रेस आणि ठाकरे यांची खेळी
पण ते काही असले तरी शरद पवारांसारख्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरलेल्या नेत्याला एका राज्यसभा उमेदवारीसाठी झगडावे लागले. काँग्रेस आणि शिवसेना यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ताणून धरले. अखेरच्या दिवसापर्यंत त्यांची उमेदवारी जाहीर होऊ शकली नाही. त्यांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांना मातोश्रीचे उंबरठे झिजवावे लागले काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागल्या, ही राजकीय वस्तुस्थिती मात्र यानिमित्ताने समोर आली. ती कुणालाही झाकून ठेवता आली नाही.
Ncp’s unification stoped, claims Jayant Patil
महत्वाच्या बातम्या
- ठाण्याच्या आनंद आश्रमात एकनाथ शिंदे यांची धुळवड साजरी; पण साधेपणाने!!
- आखाती युद्धाचा तेलाला फटका पण रशियाकडून तेल खरेदीचा भारताचा मार्ग मोकळा!!
- पवारांच्या नेतृत्वाला महाविकास आघाडीतूनच सुरुंग; काँग्रेस आणि ठाकरे यांनी रोखली पवारांची double game!!
- Amit Shah : अमित शहा म्हणाले- ममतांनी बंगालला घुसखोरांचे नंदनवन बनवले; आता त्यांना मतदार यादीतून वगळले