Thursday, 1 May 2025
  • Download App
    NCP's big list of 24 star campaigners in Goa; But even after the end of the campaign, how many turned around 

    गोव्यात राष्ट्रवादीची २४ स्टार प्रचारकांची “मोठ्ठी” यादी; पण प्रचार संपला तरी फिरकले किती??

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचे फक्त दोन दिवस शिल्लक असताना शिवसेनेचे स्टार प्रचारक आदित्य ठाकरे तिथे दोन दिवस राज्यात दिसले. त्यांनी काही ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. आज पत्रकार परिषद घेतली. NCP’s big list of 24 star campaigners in Goa; But even after the end of the campaign, how many turned around

    पण गोव्यात तब्बल 24 जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत कुठे? संपूर्ण प्रचारात ते दिसले का नाहीत? असे बोचरे सवाल विचारले जात आहेत. या स्टार प्रचारक यांचा यादीत अध्यक्ष खासदार शरद पवार खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आदी दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. पण किरकोळ अपवाद वगळता प्रचारात हे नेते दिसले का?, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी गोव्याचे दौरे केले आहेत का? केले असतील तर त्याच्या बातम्या आल्या आहेत का? असे खोचक सवालही आता सोशल मीडियातून करण्यात येत आहेत.

    गोव्यात 14 तारखेला मतदान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस स्टार प्रचारकांची भलीमोठी 24 जणांची यादी 3 फेब्रुवारी रोजी जाहीर केली होती. यामध्ये पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे प्रफुल्ल पटेल आदी दिग्गज नेत्यांचा समावेश होता. पण स्टार प्रचारकांची यादी कितीही भली मोठी असली तरी नेमके गोव्यात राष्ट्रवादीचे उमेदवार किती?, हा प्रश्न त्यावेळी विचारला गेला विचारला गेला.

    जे गोव्याचे तेच उत्तर प्रदेशाचे. गोव्यासाठी राष्ट्रवादीची 24 जणांची स्टार प्रचारकांची यादी आहे, तर उत्तर प्रदेशासाठी तब्बल 40 नेत्यांची स्टार प्रचारकांची यादी राष्ट्रवादीने रिलीज केली आहे. तिथे देखील राष्ट्रवादीचे उमेदवार नेमके किती? हा प्रश्न विचारण्यात येत आहे. उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातल्या 58 मतदारसंघातले मतदान दहा फेब्रुवारीला तारखेला झाले आहे 14 तारखेला 55 मतदारसंघात मतदान आहे या दोन्ही टप्प्यांमध्ये राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उत्तर प्रदेशात फिरकले च्या बातम्या नाहीत

    गोव्यात विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. या सर्व जागा भाजपा स्वतंत्रपणे लढवत आहे. काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना आपल्या आघाडीत घेतलेले नाही. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आघाडी केली आहे. परंतु प्रत्यक्षात दोन्ही पक्षांनी नेमके आपण किती जागा लढवणार आहेत हे अजूनही जाहीर केलेले नाही. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 403 जागा आहेत. तेथे राष्ट्रवादीचे उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष के. के. शर्मा यांना सुरुवातीला समाजवादी पक्षाने पाठिंबा जाहीर केला नंतर तो पाठिंबा रद्दही केला. प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर प्रदेशात नेमक्या किती जागा लढवणार? हे देखील स्पष्ट नाही. पण दोन्ही राज्यांमध्ये राष्ट्रवादीने स्टार प्रचारकांची भलीमोठी यादी मात्र प्रसिद्ध केली आहे.

    गोवा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या दिग्गज स्टार प्रचारकांची फौज होती पुढील प्रमाणे :

    १. शरद पवार
    २. प्रफुल्ल पटेल
    ३. सुनील तटकरे
    ४. सुप्रिया सुळे
    ५. अजित पवार
    ६. दिलीप वळसे पाटील
    ७. जयंत पाटील
    ८. जितेंद्र आव्हाड
    ९. नवाब मलिक
    १०. धनंजय मुंडे
    ११. हसन मुश्रीफ
    १२. ए. के. शशींद्रन (केरळमधील वनमंत्री)
    १३. नरेंद्र वर्मा
    १४. फौजिया खान
    १५. धीरज शर्मा
    १६. सोनिया दुहान
    १७. शब्बीर अहमद विद्रोही
    १८. जोस फिलीप डिसुजा
    १९. प्रफुल्ल हेडे
    २०. अविनाश भोसले
    २१- सतीश नारायणी
    २२. पी. सी. चाको
    २३. थॉमस के. थॉमस (आमदार, केरळ )
    २४. क्लेडे क्रास्टो

    NCP’s big list of 24 star campaigners in Goa; But even after the end of the campaign, how many turned around

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pahalgam attack : पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर “गायब”; पण ISI च्या प्रेस रिलीज मध्ये दाखवला रणगाड्यावर उभा!!

    ADR Report : एडीआर रिपोर्ट : 143 महिला खासदार आणि आमदारांविरुद्ध गुन्हेगारी खटले; 78 जणांवर गंभीर आरोप

    Indian government : भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना दिला मोठा दिलासा, घेतला ‘हा’ निर्णय!