• Download App
    राष्ट्रवादीच्या "आधारवडा"ला विश्व हिंदू परिषदेच्या "वटवृक्षा"चा खोडा!!; निवडणूक आयोगात अर्ज|NCP's "adharwad" trunk of Vishwa Hindu Parishad's "banana tree"!!; Application to Election Commission

    राष्ट्रवादीच्या “आधारवडा”ला विश्व हिंदू परिषदेच्या “वटवृक्षा”चा खोडा!!; निवडणूक आयोगात अर्ज

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या “आधारावडा”ला विश्व हिंदू परिषदेच्या “वटवृक्षा”ने खोडा घातला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे आपल्यासाठी वटवृक्ष हे चिन्ह मागितल्याची बातमी समोर येताच विश्व हिंदू परिषदेने वटवृक्ष हे चिन्ह गेल्या 60 वर्षांपासून आमचे आहे. ते कुठल्याही राजकीय पक्षाला देऊ नये. तसे दिल्यास समाज मनात संभ्रम निर्माण होईल, अशा आशयाचा अर्ज निवडणूक आयोगाकडे केला आहे.NCP’s “adharwad” trunk of Vishwa Hindu Parishad’s “banana tree”!!; Application to Election Commission

    राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ नाव आणि चिन्ह घड्याळ हे निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला सोपविल्यानंतर शरद पवारांच्या गटाला आयोगाने “राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार” असे नाव दिले. परंतु, अद्याप चिन्ह दिलेले नाही. शरद पवारांच्या गटाने वटवृक्षाचे चिन्ह आपल्या पक्षाला मिळावे, अशी मागणी निवडणूक आयोगाने केल्याची बातमी आहे.



    पवार गटाने वटवृक्ष चिन्ह निवडण्यामागे शरद पवारांचे समर्थक त्यांना “आधारवड” असे संबोधतात. पवारांसारख्या वयोवृद्ध नेत्याचा सगळ्यांनाच आधारावडासारखा आधार आहे, असे ते मानतात. त्यामुळे वटवृक्ष हे चिन्ह पक्षाला मिळाल्यास त्याचा समाज मनावर सकारात्मक परिणाम होण्याची शरद पवार गटाला आशा आहे.

    मात्र या आशेवर विश्व हिंदू परिषदेने पाणी फेरले आहे. कारण विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेपासून म्हणजे 1964 पासून वटवृक्ष हे त्यांचेच चिन्ह आहे. त्याची अधिकृत नोंद देखील आहे. विश्व हिंदू परिषदेने वटवृक्ष चिन्हासह रजिस्ट्रेशन केले आहे. शरद पवार गटाला वटवृक्ष हे चिन्ह दिले, तर समाज मनामध्ये संभ्रम निर्माण होईल, असे विश्व हिंदू परिषदेचे म्हणणे आहे आणि तेच अर्जामार्फत परिषदेने निवडणूक आयोगापर्यंत पोहोचविले आहे. त्यामुळे निवडणूक आयोग कोणता निर्णय घेतो?? शरद पवारांना वटवृक्ष हे चिन्ह बहाल करतो की त्यांना दुसरा पर्याय निवडायला सांगतो??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    NCP’s “adharwad” trunk of Vishwa Hindu Parishad’s “banana tree”!!; Application to Election Commission

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!