प्रतिनिधी
मुंबई : अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत भाजपला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची दुहाई दिली होती. पण आता स्वतः मात्र पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकीत उतरण्याची तयारी महाविकास आघाडीतल्या घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. NCP keen to contest kasba and chinchwad byelections
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक झाली. त्यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्यासाठी निवडणूक बिनविरोध करावी, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, अशी दुहाई भाजपला दिली होती. भाजपने आपला उमेदवारही मागे घेतला होता.
पण आता मात्र पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदार संघाची पोट निवडणूक जाहीर झाली आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपचा आमदार होता, मात्र या दोन्ही ठिकाणची पोट निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते इच्छूक असल्याचे म्हटले आहे.
भाजपकडून चिंचवड येथे शंकर जगताप अथवा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचे नाव कळवले आहे. तसेच कसबा विधानसभासाठी भाजपची काही नावे पुढे येत आहेत. तसेच दिवंगत मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक हे देखील इच्छुक आहेत. त्यांचा निर्णय भाजप घेणार आहे. मात्र दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवावी अशी इच्छा दोन्ही शहरातील आमच्या कार्यकर्त्यांची आहे, त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल का?, याबाबत मला शंका आहे, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.
कोणाची नावे आहेत चर्चेत?
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसने एकमुखाने हा निर्णय घेतला आहे. आज शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यासमोर प्रस्ताव मांडणार आहे. ज्येष्ठ नेत्यांशी स्थानिक नेते चर्चा करणार आहे. जर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर चिंचवड शहरातील काही नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात नाना काटे, भाऊसाहेब भोईर यांच्या नावांचा समावेश आहे.
त्यामुळे आता जर निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला तर राष्ट्रवादी कोणाला रिंगणात उतरवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यांच्यासोबतच शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी 2019 च्या विधानसभेच्या वेळी शिवसेनेतून बंडखोरी केली होती. त्यावेळी ते लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात काही हजारांच्या मतांनी पराभूत झाले होते. या पोटनिवडणुकीच्या उमेदवारांच्या नावामध्ये त्यांच्या नावाचीही चर्चा आहे. तर कसबा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे – पाटील या इच्छूक आहेत. त्यांनी मनसेतून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यापासून इथे काम करायला सुरुवात केली आहे.
NCP keen to contest kasba and chinchwad byelections
महत्वाच्या बातम्या