• Download App
    राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीत अतीक अहमद हत्येवर शरद पवारांचे सूचक भाष्य; यंत्रणांनी कायदा हातात घेऊ नये!! NCP chief Sharad Pawar says, "A country runs as per the Constitution and law.

    राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीत अतीक अहमद हत्येवर शरद पवारांचे सूचक भाष्य; यंत्रणांनी कायदा हातात घेऊ नये!!

    वृत्तसंस्था

    मुंबई : उत्तर प्रदेशातील गँगस्टर माफिया अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांच्या हत्येच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीत सूचक भाष्य केले आहे. अलीकडे सरकारी यंत्रणांनी कायदा हातात घेण्याचे प्रमाण वाढले आहे आणि त्याचे सार्वत्रिक कौतुक करण्याचीही फॅशन आली आहे. ती देशातल्या संविधान आणि कायद्यासाठी घातक आहे, असे उद्गार पवारांनी राष्ट्रवादीच्या इतर पार्टीत काढले. NCP chief Sharad Pawar says, “A country runs as per the Constitution and law.

    मुंबई शहर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलने ही इफ्तार पार्टी आयोजित केली होती. या इफ्तार पार्टीला विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, फौजिया खान, विद्या चव्हाण आदी नेते उपस्थित होते.

    या इफ्तार पार्टीतच शरद पवार यांनी उत्तर प्रदेशातील गँगस्टर माफिया अतिक अहमद आणि अश्रफ अहमद यांच्या झालेल्या हत्येचा सूचक उल्लेख केला. अलीकडे सरकारी यंत्रणा कायदा हातात घेतात आणि त्याचेही सर्वत्र कौतुक करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. देशात कायदा आणि संविधानाचे राज्य आहे. या राज्याला या प्रवृत्तींमुळे धोका उत्पन्न होतो, असे उद्गार शरद पवारांनी काढले. यावेळी छगन भुजबळ यांचे देखील भाषण झाले. या भाषणात त्यांनी हिंदू – मुस्लिम एकतेचा आणि देशात वातावरण बिघडल्याचा उल्लेख केला. एकमेकांना खजूर भरवून यावेळी रोजा उपवास सोडण्यात आला.

    NCP chief Sharad Pawar says, “A country runs as per the Constitution and law.

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज