वृत्तसंस्था
मुंबई – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि ठाकरे – पवार सरकार यांच्यात चाललेल्या विशिष्ट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.NCB Zonal Director Sameer Wankhede writes to Mumbai Police Commissioner requesting him
आपण नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोतर्फे कायदेशीर कारवाई करतो आहोत. आपल्याला काही अतिवरिष्ठ सार्वजनिक सेवकांकडून नोकरीवरून काढून टाकण्याच्या आणि जेलमध्ये पाठविण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्यावर कोणतीही पूर्वग्रह दूषित पध्दतीने कायदेशीर कारवाई करण्यात येऊ नये, असा इशारा समीर वानखेडे यांनी या पत्रात दिला आहे.
काही जणांकडून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर काही कायदेशीर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे ध्यानात आले आहे, याबाबत पत्र लिहून समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.
-नवाब मलिक यांचा इशारा
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातला साक्षीदार किरण गोसावी याचा खासगी बॉडिगार्ड प्रभाकर साईल याने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी डील झाल्याचा दावा केला आहे. समीर वानखेडे आणि किरण गोसावी यांनी मिळून कसे सर्वांना पकडले याची माहिती प्रभाकर साईलने दिली आहे.
या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक आक्रमक झाले असून त्यांनी समीर वानखेडे यांच्या विरोधात राज्याच्या विशेष तपास पथकाद्वारे अर्थात एसआयटी चौकशी लावण्याची मागणी केली आहे.
पिंपरी – चिंचवडमध्ये नवाब मलिकांनी समीर वानखेडे आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा बाप काढला होता. तर आता त्यांच्या विरोधात एसआयटी चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. औरंगाबादमध्ये बोलताना नवाब मलिक म्हणाले, की महाराष्ट्रात संघटित गुन्हेगारी वाढते आहे. त्यांच्याकडून वसूली करण्यापर्यंत अधिकाऱ्यांची मजल गेली आहे. कोट्यावधी रूपये अधिकाऱ्यांनी उकळले आहेत. ते अनेकांवर खोट्या केसेस दाखल करीत आहेत. याचा तपास आणि चौकशी झाली तर अनेक धक्कादायक बाबी पुढे येतील. आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना भेटून या एकूण प्रकरणाची एसआयटी चौकशी लावण्याची मागणी करणार आहोत, असे नवाब मलिक यांनी सांगितले होते.
NCB Zonal Director Sameer Wankhede writes to Mumbai Police Commissioner requesting him
महत्त्वाच्या बातम्या
- IND vs PAK: महान सामन्यात हे पाच मोठे विक्रम होऊ शकतात, कोहली, रोहित आणि बुमराहलाही इतिहास रचण्याची संधी
- गोपीचंद पडळकर यांचं मोठं विधान ; म्हणाले – भविष्यात राजेश टोपेंची जागा आर्थर रोड तुरुंगात असेल
- १००% लसीकरणासाठी नाशिक जिल्ह्यातील ‘या’ गावाने लढविली आयडियेची कल्पना!!
- निजामशाहीची पालखी वाहण्यात मोठा आनंद; गोपीचंद पडळकर यांची संजय राऊतांवर टीका