• Download App
    एनसीबीचे उपमहासंचालक म्हणाले यंत्रणा स्वच्छ करायचीय, समीर वानखेडे यांनाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकतेNCB deputy director general says Sameer Wankhede may be summoned for questioning

    एनसीबीचे उपमहासंचालक म्हणाले यंत्रणा स्वच्छ करायचीय, समीर वानखेडे यांनाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते

    अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान संबंधित क्रुझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांचे मोहोळ उठविण्यात आले आहे. वानखेडे यांच्याकडून या प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आल्यावर आता उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे. आपल्याला यंत्रणा स्वच्छ करायची आहे. समीर वानखेडे यांनाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, असे सिंह यांनी म्हटले आहे.NCB deputy director general says Sameer Wankhede may be summoned for questioning


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान संबंधित क्रुझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांचे मोहोळ उठविण्यात आले आहे. वानखेडे यांच्याकडून या प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आल्यावर आता उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे. आपल्याला यंत्रणा स्वच्छ करायची आहे. समीर वानखेडे यांनाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, असे सिंह यांनी म्हटले आहे.

    आपणही चुकू शकतो. आमच्याकडून चूक झाली असेल तर आम्ही ती सुधारू. कोणताही विभाग निर्दोष नाही. समीर वानखेडे यांनाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, असे ते म्हणाले. शपथपत्रात साक्षीदाराच्या नावाशिवाय एनसीबीचे अधिकारीही रडारवर असू शकतात.


    समीर वानखेडे यांच्या मदतीला आता किरीट सोमय्या, अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षांची घेतली भेट


    क्रूझ ड्रग्ज प्रकरणात स्वतंत्र साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलवर 25 कोटींची लाच घेतल्याचा आरोप केल्यानंतर एनसीबीचे दक्षता पथक या प्रकरणात दाखल झाले आहे. एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्या नेतृत्वाखाली 7 सदस्यांचे पथक क्रझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत आहे. गुरुवारी याप्रकरणी ज्ञानेश्वर सिंह यांनी माध्यमांसमोर येऊन आतापर्यंतच्या तपासावर आपली बाजू मांडली.

    एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह म्हणाले की, मुंबईत आल्यानंतर एनसीबीच्या पथकाने सात साक्षीदारांचा तपासात समावेश केला आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक आणि कागदोपत्री पुरावे गोळा करण्यात आले आहेत. पथकाने घटनास्थळी भेट दिली. प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे, आम्ही लवकरच निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. सिस्टम क्लीन करण्यावर आमचे लक्ष्य दक्षता पथकाच्या रडारवर समीर वानखेडे, किरण गोसावी, प्रभाकर साइल, पूजा ददलानी, सॅम डिसोझा, सुनील पाटील, मनीष भानुशाली, मोहित कंबोज, विजय पगारे, काशिफ खान, रणजितसिंग बिंद्रा, मोर गुळे, अस्लम शेख हे आहेत.

    काही दिवसांपूर्वी, टीमने नवाब मलिक यांचे जावई, समीर खान प्रकरणाचे आयओ आशिष रंजन यांना सलग दोन दिवस दिल्ली मुख्यालयात 200 हून अधिक प्रश्न विचारले होते. समीर वानखेडे आणि त्याच्या तपासाबाबत सर्व प्रश्न विचारण्यात आले. त्याचवेळी आर्यन प्रकरणात आयओ असलेले व्हीव्ही सिंग यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. त्याच्या क्रूझमध्ये ड्रग पाटीर्ची माहिती असल्याने खंडणीच्या आरोपावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले.

    NCB deputy director general says Sameer Wankhede may be summoned for questioning

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य