वृत्तसंस्था
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात NCB ने मुंबईत मोठी कारवाई केली आहे. तब्बल 50 किलो एमडी ड्रग्ज एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईत जप्त केले आहेत. फोर्टमधल्या कबुतरखाना परिसरातल्या गोडाऊनमध्ये हे ड्रग्स सापडले आहेत. NCB action: MD drugs worth 100 crore seized from a godown in Kabutarkhana area in Mumbai
50 किलो ड्रग्ज जप्त करत एनसीबीने दोन आरोपींना अटक केली आहे. जप्त केलेल्या एमडी ड्रग्सची किंमत सुमारे 100 कोटी रुपये इतकी आहे. अटक केलेल्या दोन आरोपींपैकी एक जण भारतातील सर्वात मोठ्या ड्रग्ज तस्करांपैकी एक असल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे मुंबईचे रहिवासी असून हे एक मोठे नेटवर्क आहे ज्यात आणखी काही लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तसेच, या प्रकरणात याआधीही काही जणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई – जामनगरची कारवाई एकच
गुजरातमध्येही एनसीबीने एमडी ड्रग्ज प्रकरणात कारवाई केली आहे. एकूण 60 किलो एमडी जप्त करण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 120 कोटी इतकी आहे. गुजरातच्या जामनगर येथे करण्यात आलेल्या कारवाईमध्ये चार जणांना अटक करण्यात आली आहे. एअर इंडियाचा पायलट सोहेलला या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आणि जामनगर येथे करण्यात आलेली छापेमारी ही एकाच प्रकरणाशी संबंधित आहे. एका लॅबमध्ये हे ड्रग्ज बनवले जात होते. लॅब चालवणा-या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी याआधी अटक केली आहे.
NCB action: MD drugs worth 100 crore seized from a godown in Kabutarkhana area in Mumbai
महत्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरे -प्रकाश आंबेडकर एकत्र येणार : महापालिकांसाठी युतीची तयारी; मुंबई, औरंगाबाद मनपात विजयासाठी रणनीती
- अंधेरी पोटनिवडणूक : शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा, शिंदे गट हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप
- राष्ट्रवादीचा आरोप :मुख्यमंत्र्यांचा बीकेसीवरील मेळावा फेल, तपासे म्हणाले- धोरणही जाहीर करता आले नाही
- ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ म्हणणार्या मोदींच्या रेल्वे मंत्रालयात चार लाख डॉलरची लाच; सीबीआयमार्फत चौकशी करण्याची राष्ट्रवादीची मागणी