वृत्तसंस्था
नवी दिल्ली : इंडियाविरोधी आघाडीत समाविष्ट असलेल्या पक्षांनी गुरुवारी (14 सप्टेंबर) काही वृत्तवाहिन्यांच्या अँकरच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर न्यूज ब्रॉडकास्ट अँड डिजिटल असोसिएशन (NBDA) ने टीका केली आहे.NBDA criticizes INDIAs decision to boycott 14 anchors, says it threatens freedom of press
एक निवेदन जारी करून, NBDA ने म्हटले की, मीडिया कमिटी ऑफ इंडिया अलायन्सने सांगितले आहे की, ते काही पत्रकार/अँकर यांच्या शो आणि कार्यक्रमांना त्यांचे प्रतिनिधी पाठवणार नाहीत. आघाडीने घेतलेल्या निर्णयामुळे एनबीडीए अतिशय व्यथित आणि चिंतेत आहे. या निर्णयाने धोकादायक उदाहरण घालून दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
“लोकशाहीच्या विरोधात”
निवेदनात पुढे म्हटले आहे की, विरोधी आघाडीच्या प्रतिनिधींना देशातील काही आघाडीच्या टीव्ही वृत्त व्यक्तिमत्त्वांच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यास बंदी घालणे लोकशाहीच्या शिष्टाचाराच्या विरोधात आहे. हे असहिष्णुतेचे प्रतीक आहे आणि माध्यमांचे स्वातंत्र्य धोक्यात आणणारे आहे.
“आणीबाणीच्या काळात जाण्यासारखे”
आणीबाणीच्या कालावधीचा संदर्भ देत NBDA ने सांगितले की काही पत्रकार/अँकरचा बहिष्कार देशाला आणीबाणीच्या काळात घेऊन जातो. जेव्हा प्रेस बंद केली गेली आणि स्वतंत्र आवाज चिरडले गेले.
https://x.com/rahulkanwal/status/1702343717888159961?s=20
निर्णय मागे घेण्याची विनंती
NBDAने विरोधी आघाडीला हा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले आहे, कारण असा निर्णय पत्रकारांना धमकावणारा आणि प्रसारमाध्यमांचे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपून टाकणारा आहे.
विरोधी आघाडीचे नेते काय म्हणाले?
काँग्रेसच्या मीडिया विभागाचे प्रमुख आणि विरोधी आघाडीच्या मीडिया कमिटीचे सदस्य पवन खेरा यांनी गुरुवारी ही यादी जाहीर करताना काही वाहिन्यांवर दररोज सायंकाळी 5 वाजल्यापासून द्वेषाची दुकाने लावली जातात, असे सांगितले होते. द्वेषाच्या बाजाराचे आम्ही ग्राहक बनणार नाही. द्वेषमुक्त भारत हे आमचे ध्येय आहे.
ते म्हणाले की, जड अंत:करणाने काही अँकरच्या शो आणि कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आमच्या नेत्यांच्या विरोधात अनियंत्रित टिप्पण्या, फेक न्यूज इत्यादींविरुद्ध लढत आलो आहोत आणि लढत राहू, पण समाजात द्वेष पसरू देणार नाही.
NBDA criticizes INDIAs decision to boycott 14 anchors, says it threatens freedom of press
महत्वाच्या बातम्या
- मोदी राजवटीत अविष्कार स्वातंत्र्याच्या नावाने “ढोलबडवी पुकार”; पण आता I.N.D.I.A आघाडीचा 14 अँकर्सवर बहिष्कार!!
- भर पावसात अजमेरमध्ये फडणवीसांची दणदणीत सभा; केवळ सत्ता परिवर्तन नाही, तर जनजीवनात परिवर्तनासाठी भाजपा!!
- मुंबईच्या पाच एंट्री पॉईंट्सवरील टोलमध्ये १ ऑक्टोबरपासून १२.५ ते १८.७५ टक्के होणार वाढ
- दिल्ली उत्पादन शुल्क प्रकरणात ‘ED’ने मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी कविता यांना पाठवले समन्स!