तर दहा लाखांचा इनाम असलेल्या नक्षलवाद्यास केलं अटक
विशेष प्रतिनिधी
रांची :Jharkhand झारखंड नक्षलमुक्त करण्याच्या उद्देशाने, झारखंड पोलिस आणि सुरक्षा दल सतत मोठ्या संयुक्त मोहिमा राबवत आहेत. दरम्यान, झारखंडमधील लातेहार जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली आहे.Jharkhand
यावेळी झालेल्या चकमकीत, सुरक्षा दलांनी सब-झोनल नक्षलवादी कमांडर मनीष यादवला ठार मारले, ज्याच्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस होते. तसेच या चकमकीदरम्यान, सुरक्षा दलांनी कुख्यात नक्षलवादी कुंदन खरवार याला अटक केली आहे, ज्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस होते.
शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांना दोन स्वयंचलित रायफल देखील जप्त करण्यात आल्या. सुरक्षा दलांचे शोध अभियान सुरूच आहे. झारखंडमधील लातेहार जिल्ह्यातील महुआदार पोलिस स्टेशन हद्दीतील क्रारामखड आणि दोना दरम्यान नक्षलवादी असल्याच्या माहितीच्या आधारावर सुरक्षा दलांकडून जंगलात शोध मोहीम राबविण्यात येत होती.
दरम्यान, रविवारी रात्री उशिरा ते सोमवार सकाळपर्यंत पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. यामध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तर कारवाईत ५ लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी मनीष यादव ठार झाला. दरम्यान, १० लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलवादी कुंदन खेरवारलाही अटक करण्यात आली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी दोन रायफलही जप्त केल्या आहेत.
Naxal with a reward of Rs 5 lakh killed in Jharkhand
महत्वाच्या बातम्या
- Economy : अर्थव्यवस्थेत भारताने जपानला टाकलं मागे, आता जर्मनीची वेळ
- Jyoti Malhotras : ज्योती मल्होत्राच्या फोनवरून मोठा खुलासा, पाकिस्तानी युट्यूबरसोबत करत होती काम!
- Lalu Prasad Yadav : बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी मोठी कारवाई
- Mysore Pak : आता ‘म्हैसूरपाक’ नाही ‘म्हैसूर श्री’ म्हणायचं