मृत्युमुखी पडलेले अंगरक्षक आणि आणखी एका पोलिसाकडील 3 एके-47 रायफली हिसकावून घेऊन नक्षली घटनास्थळावरून पळून गेले. Naxal attack on former Jharkhand MLA, briefly defended; Naxals brutally kill two bodyguards
विशेष प्रतिनिधी
झारखंड : झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील एका गावात फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून नायक त्या सामन्यावेळी उपस्थित राहिले. सामना संपताच प्रेक्षकांमध्ये बसलेल्या नक्षलवाद्यांच्या गटाने नायक यांच्यावर हल्ला केला.सुदैवाने गुरूचरण नायक या हल्ल्यात बचावले.
परंतु त्यांचे अंगरक्षक असणाऱ्या दोन पोलिसांची नक्षलींनी निर्घूण हत्या केली.नक्षलींनी प्रथम गोळीबार केल्याचे समजल्यावर सगळीकडे मोठा गोंधळ उडाला. त्यावेळी पोलीस अंगरक्षक मदतीसाठी पुढे सरकले दरम्यान हल्ल्याच्या ठिकाणावरून स्वतःचा बचाव करून निघून जाण्यास नायक यशस्वी ठरले.परंतु नक्षल्यांनी दोन अंगरक्षकांची गळे चिरून हत्या केली.
मृत्युमुखी पडलेले अंगरक्षक आणि आणखी एका पोलिसाकडील 3 एके-47 रायफली हिसकावून घेऊन नक्षली घटनास्थळावरून पळून गेले. संबंधित हल्ल्याची माहिती मिळताच अतिरिक्त सुरक्षा बळ घटनास्थळी दाखल झाले.दरम्यान हल्ला झालेले गाव जंगलव्याप्त भागात वसलेले आहे. त्यामुळे दुर्गम भाग असल्याने हल्ल्याविषयीचा अधिक माहिती तातडीने मिळू शकली नाही.