• Download App
    महत्वाच्या बातम्या ममता बॅनर्जी 1 जूनच्या ‘इंडी’ आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार नाहीत! रेमल वादळाचा तडाखा! बंगालमध्ये सहा आणि बांगलादेशात 10 जणांचा मृत्यू राहुल गांधींनी आधी भारतीय सैन्यात काम करून दाखवावे, मग अग्निवीर योजनेविषयी बडबड करावी; जनरल व्ही. के. सिंग यांचा इशारा!! लष्करप्रमुख मनोज पांडे यांना सेवेत एक महिन्याची मुदतवाढ Nawaz Sharif admitted the mistake we violated the agreement with former Prime Minister Atalji

    ‘आम्ही माजी पंतप्रधान अटलजींसोबत केलेल्या कराराचे उल्लंघन केले’

    अखेर नवाझ शरीफ यांनी चूक मान्य केलीच

    विशेष प्रतिनिधी

    इस्लामाबाद : ‘पाकिस्तानने भारतासोबत झालेल्या कराराचे उल्लंघन केले आणि आमच्याकडून चूक झाली.’ पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन)चे नवनिर्वाचित अध्यक्ष नवाझ शरीफ यांनी आपली चूक मान्य केली आहे. Nawaz Sharif admitted the mistake we violated the agreement with former Prime Minister Atalji

    नवाझ शरीफ म्हणाले की, 28 मे 1998 रोजी पाकिस्तानने पाच अणुचाचण्या केल्या होत्या. यानंतर भारताचे तत्कालीन पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तानात आले आणि एक करार झाला. नवाझ शरीफ पुढे म्हणाले की, ‘आम्ही त्या कराराचे उल्लंघन केले आणि ही आमची चूक होती.’



    21 फेब्रुवारी 1999 रोजी शरीफ आणि वाजपेयी यांनी शिखर परिषदेनंतर लाहोर करारावर स्वाक्षरी केली होती. या करारात दोन्ही देशांमध्ये शांतता आणि स्थैर्य राखण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर काही महिन्यांतच पाकिस्तानच्या घुसखोरीमुळे कारगिल युद्ध झाले.

    नवाझ शरीफ यांनी इम्रान खानवर निशाणा साधला

    अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी आण्विक कार्यक्रम थांबवण्यासाठी पाच अब्ज डॉलर्सची ऑफर दिली होती, असा दावाही पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले, ‘मी ही ऑफर नाकारली होती पण माजी पंतप्रधान इम्रान खान माझ्या खुर्चीवर असते तर त्यांनी क्लिंटन यांची ऑफर नक्कीच स्वीकारली असती.’

    Nawaz Sharif admitted the mistake we violated the agreement with former Prime Minister Atalji

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के