विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एकीकडे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे भारताची माफी मागतात, तर दुसरीकडे त्यांचाच भारतातला माजी राजदूत काश्मीर मागण्यासाठी पुढे आलाय. पाकिस्तानी मुत्सद्देगिरीचे हे पुरते त्रांगडे झाले आहे. Nawaz Sharif accepts mistake, but Abdul Bashir demanded Kashmir
कारगिल वर हल्ला करून पाकिस्तानने चूक केली. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याबरोबर झालेल्या लाहोर कराराचे पाकिस्तानने उल्लंघन केले, अशी कबुली माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिली. त्यावेळी पाकिस्तानने लाहोर कराराचे उल्लंघन केले नसते, तर भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध आज वेगळ्या चांगल्या स्तरावर असते, असे वक्तव्य शरीफ यांनी केले.
एकीकडे पाकिस्तानचा माजी पंतप्रधान भारताची माफी मागतोय तर दुसरीकडे त्याच देशाचे भारतातले माजी राजदूत अब्दुल बासित यांनी भारताकडे काश्मीरची मागणी केली आहे. भारताने कर्तारपूर साहेब घ्यावा आणि त्या बदल्यात पाकिस्तानला काश्मीर देऊन टाकावे, असे मुद्दाम उद्गार अब्दुल भाषेत यांनी काढले.
ज्या कर्तारपूर साहेब मध्ये गुरुनानक यांनी आपले अखेरचे दिवस व्यतीत केले, ते शहर भारतीयांसाठी अत्यंत पवित्र स्थान आहे. फाळणीच्या वेळी ते पाकिस्तानात गेले. पण 1971 मध्ये भारताबरोबर पाकिस्तानचे युद्ध झाले त्यावेळी पाकिस्तानचे 93 हजार कैदी भारताच्या ताब्यात होते आपण त्यांच्या बदल्यात कर्तारपूर साहेब घेतले असते, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याच वक्तव्याचा आधार घेऊन पाकिस्तानचा माजी राजदूत अब्दुल बासित याने भारता भारत आणि कर्तारपूर साहेब घ्यावे आणि काश्मीर पाकिस्तानला द्यावे, असे उद्दाम उद्गार काढले.