• Download App
    इंधनांच्या वाढत्या किंमती वरून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी साधला पीएम मोदींवर निशाणा | Nawab malik targets modi over the increased prices of petrol and diesel

    इंधनांच्या वाढत्या किंमती वरून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी साधला पीएम मोदींवर निशाणा

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : इंधन दरवाढीने शनिवारी सलग तिसऱ्यांदा उच्चांक गाठला आहे. ही वाढ निश्चितच एक विक्रमी वाढ म्हणून नोंदवण्यात येऊ शकते. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे प्रतिलिटर मागे 35 पैशांनी दर वाढवले आहेत असे जाहीर केले आहे. या दरवाढीमुळे सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. गेल्या तीन आठवड्यांमधील पेट्रोलमधील हे 15 वी तर डिझेल दरातील ही 18 वी दरवाढ आहे.

    Nawab malik targets modi over the increased prices of petrol and diesel

    या दरवाढीमुळे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदी यांना निशाण्यावर धरले आहे. 2014 मध्ये जेव्हा मोदी यांनी निवडणूक जिंकली होती आणि ये सत्तेत आले होते, त्यावेळी इंधनाचे भाव कमी झाले होते. यावेळी मोदींनी माझ्या नशिबाने इंधनाचे दर कमी होत आहेत असे वक्तव्य केले होते. तुम्हाला तुमचे चांगले नशीब हवे आहे की नको? असे म्हणत मोदींनी विरोधकांना चांगलेच डिवचले देखील होते.


    Nawab Malik vs Fadanvis:नवाब मलिकांनी घेतली आर्यनची बाजु तर फडणवीस म्हणतात…NCB म्हटलं की नवाब मलिक यांच्या पोटात का दुखतं सगळ्यांना माहित आहे …


    हाच मुद्दा पकडून नवाब मलिक यांनी मोदींवर टीका केली आहे. तुमच्या नशिबानेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले की जनतेच्या नशिबाने वाढलेत? याचं उत्तर मोदींनी द्यावं असं नवाब मलिक म्हणाले आहेत. कोण जास्त बदनशीबी आहे? देशातील जनता की तुम्ही? याचं उत्तर मोदींनी द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

    Nawab malik targets modi over the increased prices of petrol and diesel

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत