विशेष प्रतिनिधी
चंदिगड : अमृतसर येथील सुवर्णमंदिरावर ऑपरेशन ब्ल्यू स्टारची केलेली कारवाई आणि त्यानंतर दिल्लीमधील झालेली शिखविरोधी दंगल ही शिख समाजाच्या मनावरची भळभळती जखम. पंजाब कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचे सल्लागार मलविंदरसिंग माली यांनी ही भळभळती जखम पुन्हा उघड केली आहे. मानवी कवट्यांच्या ढिगाऱ्यावर बंदूक घेऊन उभ्या इंदिरा गांधी यांचे स्केच त्यांनी पोस्ट केले आहे.Navjyot Singh Sidhu’s advisers target Congress, posted sketch Indira Gandhi with a gun on a pile of human skulls
माली यांनी नुकतेच तालिबान आणि काश्मीरबाबत वादग्रस्त पोस्ट केली होती. आता तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे एक वादग्रस्त स्केच पोस्ट केले आहे. हे एका जुन्या पंजाबी मासिकाच्या मुखपृष्ठावरील स्केच असून, १९८४ मध्ये झालेल्या दंगलींचे चित्र दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मालींच्या कृत्यावरुन पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग हे संतप्त झाले असून त्यांनी सिद्धू यांना इशारा दिला आहे.
मालविंदरसिंग यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून हे स्केच शेअर केले आहे. हे चित्र पंजाबमधल्या जनतक पैगाम या मासिकाच्या जून १९८९ च्या अंकाचे मुखपृष्ठ होते. त्यावेळी मालविंदरसिंग माली या मासिकाचे संपादक होते. या फोटोत इंदिरा गांधी मानवी कवट्यांच्या ढिगावर हातात बंदूक घेऊन उभ्या आहेत तर त्यांच्या बंदुकीच्या टोकावर एक कवटी अडकवलेली दिसत आहे.
दडपशाहीचा पराभव होतो. प्रत्येक अत्याचार करणारा तोंडावर आपटतोच, असे त्यावर वाक्य लिहिले आहे. शीखविरोधी दंगलींसंदर्भात हे चित्र त्यावेळी छापण्यात आले होते. पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे माली यांनी केलेल्या या पोस्टमुळे पंजाब काँग्रेसची अडचण वाढली आहे. काँग्रेस नेत्यांच्या विरोधानंतरही हे पोस्ट माली हटवित नसून भाजपने मात्र या पोस्टचे स्वागत केले आहे.
भाजपचे सरचिटणीस तरुण चुघ यांनी सिद्धू आणि मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या पार्श्वभूमीवर अमरिंदरसिंग यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता, याचे स्मरणही चुघ यांनी करून दिले.
वादग्रस्त पोस्टवरुन पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग संतप्त झाले आहेत. ते म्हणाले, की हे देशविरोधी कार्य आहे. एवढ्या तणावानंतरही त्यांनी आपले वक्तव्य मागे घेतलेले नाही. माली यांनी केवळ सिद्धू यांना सल्ला द्यावा. अर्धवट माहिती असलेल्या किंवा कोणतेही ज्ञान नसलेल्या इतर मुद्यांवर त्यांना बोलण्याची गरज नाही, असे खडे बोल अमरिंदरसिंग यांनी माली यांना सुनावले आहेत.
तुमचे सल्लागार वास्तविकतेपासून खूप लांब असून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा इशाराही त्यांनी सिद्धू यांना दिला आहे.यापूवीर्ही एका वादग्रस्त विधानामुळे मालविंदरसिंग चर्चेत आले होते. काश्मीर हा एक वेगळा देश आहे, भारत आणि पाकिस्तानने बेकायदेशीरपणे व्यापलेला आहे. काश्मीर काश्मीरच्या लोकांचा आहे, असे ट्विट त्यांनी केले होते.
Navjyot Singh Sidhu’s advisers target Congress, posted sketch Indira Gandhi with a gun on a pile of human skulls
महत्त्वाच्या बातम्या
- लसीकरणाने गती घेतली नाही तर… दुसऱ्या लाटेपेक्षा कोरोनाची तिसरी लाट विक्राळ असेल
- कन्नौजमध्ये सापडला खजिना! रायपूर टेकडीच्या उत्खननात सापडलेल्या नाण्यांनी भरलेला कलश घेऊन जेसीबी चालक गेला पळून
- पाकधार्जिणे लोक पंजाब काँग्रेसमध्ये असावे का? मनीष तिवारी यांचा नवज्योतसिंग सिध्दू यांना घरचा आहेर
- टीशर्टवर पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा लिहिणाऱ्या युवकाला अटक,राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल