विशेष प्रतिनिधी
चंदीगढ: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांची अमृतसर पूर्वमधून अकाली दलाचे विक्रम सिंग मजीठिया यांच्याशी लढत होणार त सिंग सिध्दू यांची विक्रम सिंग मजीठिया यांच्याशी लढत आहे. मजीठिया यांनी मजीठामधूनही उमेदवारी अर्ज दाखल केला. ॅविक्रमसिंग मजीठिया आणि नवज्योत सिंग सिध्दू यांच्यात सध्या पंजाबच्या राजकारणात विळ्या-भोपळ्याचे वैर आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे.Navjot Singh Sidhu’s fight with Vikram Singh Majithia
२०१३ मध्ये पंजाबमध्ये सहा हजार कोटी रुपयांच्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. त्यावेळी पकडण्यात आलेल्या जगदिश भोला याने मजीठिया यांचे नाव घेतले होते असे म्हटले जाते. परंतु, मजीठिया यांच्यावर सात वर्षांनी कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर वॉरंटही बजावण्यात आले होते. ऐन निवडणुकीच्या काळात हे टाईमिंग कसे साधले असा सवालही करण्यात येत होता. सिध्दू यांनीच हे प्रकरण पेटविल्याचा अकाली दलाचा आरोप आहे. त्यामुळे मजीठिया हे सिध्दू यांच्याविरुध्द उभे आहेत.
पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री चन्नी यांनी भदौडमधून, तर प्रकाश सिंग बादल यांनी लांबी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. बादल या मतदारसंघातून सलग पाचवेळा निवडणूक जिंकत आले आहेत. जलालाबाद मतदारसंघातून सुखबीर सिंग बादल यांनी, तर माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पटियालामधून उमेदवारी अर्ज दाखल केला.
सोमवारी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल, शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबिर सिंह बादल यांच्यासह राज्यांतील दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी अमृतसर पूर्वमधून, आम आदमी पाटीर्चे प्रदेशाध्यक्ष भगवंत मान यांनी धुरी मतदारसंघातून, तर अकाली दलाचे विक्रम सिंग मजीठिया यांनी अमृतसर पूर्व आणि मजीठामधून उमेदवारी अर्ज दाखल केला.
बसपाचे प्रदेशाध्यक्ष जसबीर सिंह यांनी गढी फगवाडा मतदारसंघातून आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष अश्वनी शर्मा यांनी पठाणकोटमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संयुक्त अकाली दलाचे अध्यक्ष सुखदेव सिंग ढिंढसा यांचे पुत्र व माजी मंत्री परमिंदर सिंग ढिंढसा यांनी लहरागा मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १ फेब्रुवारी आहे. ४ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. पंजाब विधानसभेच्या एकूण ११७ जागांसाठी आतापर्यंत ६१९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून २० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
Navjot Singh Sidhu’s fight with Vikram Singh Majithia
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रपतींच्या अभिभाषणात पालखीमार्गाचा उल्लेख, केंद्र सरकार रुंदीकरण करत असल्याबद्दल केले व्यक्त समाधान
- वडलांनी राजकारणात संधी दिलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यानेच दिले मुलाला आव्हान, अखिलेश यादव यांना करहल मतदारसंघात द्यावी लागणार कडवी लढत
- पाकिस्तानी मौलवीच्या विखारी व्हिडीओमुळेच मुस्लिम मारेकऱ्यांकडून हिंदू तरुणाची हत्या
- उत्तर प्रदेशात विरोधकांकडून दंगलीच्या मानसिकतेवाल्या लोकांना तिकिटे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप