• Download App
    राजीनाम्यानंतर सिद्धूंचा पहिल्यांदाच खुलासा, म्हणाले- कलंकित नेते परतणे मंजूर नाही, अखेरपर्यंत पंजाबसाठी सत्याची लढाई लढेन । Navjot Singh Sidhu shared new video said No personal rivalry with anyone in punjab congress

    राजीनाम्यानंतर सिद्धूंचा पहिल्यांदाच खुलासा, म्हणाले- कलंकित नेते परतणे मंजूर नाही, अखेरपर्यंत पंजाबसाठी सत्याची लढाई लढेन

    Navjot Singh Sidhu : पंजाबच्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सिद्धू यांनी हायकमांडवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. पंजाबी भाषेत रिलीज झालेल्या या व्हिडिओमध्ये ते म्हणाले की, पंजाबच्या अजेंड्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत हक्क आणि सत्याची लढाई लढत राहीन. सिद्धू यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे ज्यात त्यांनी म्हटले आहे की, मी हायकमांडची दिशाभूल होऊ देणार नाही आणि करणारही नाही. Navjot Singh Sidhu shared new video said No personal rivalry with anyone in punjab congress


    वृत्तसंस्था

    चंदिगड : पंजाबच्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सिद्धू यांनी हायकमांडवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. पंजाबी भाषेत रिलीज झालेल्या या व्हिडिओमध्ये ते म्हणाले की, पंजाबच्या अजेंड्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत हक्क आणि सत्याची लढाई लढत राहीन. सिद्धू यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे ज्यात त्यांनी म्हटले आहे की, मी हायकमांडची दिशाभूल होऊ देणार नाही आणि करणारही नाही.

    ते म्हणाले, मी कोणत्याही प्रकारे नैतिकतेशी तडजोड करणार नाही. सिद्धू म्हणाले, ‘माझी कोणाशीही वैयक्तिक लढाई नाही. माझा लढा पंजाबच्या अजेंड्यासाठी आहे. ते म्हणाले की, मी सत्यासाठी लढलो आहे आणि वचन आहे की मी लढत राहीन.

    सिद्धू म्हणाले, ‘मी पंजाबशी संबंधित समस्यांसाठी बराच काळ लढा दिला. यापूर्वी येथे कलंकित नेते आणि अधिकारी होते. आता तुम्ही तीच व्यवस्था पुन्हा करू शकत नाही. मी पंजाबच्या लोकांसाठी कोणतेही बलिदान देण्यास तयार आहे. पण मी माझ्या तत्त्वांना तिलांजली देणार नाही.

    सिद्धू या व्हिडिओत म्हणाले, ‘माझा 17 वर्षांचा राजकीय प्रवास एका उद्देशासाठी आहे. पंजाबमधील लोकांचे जीवनमान सुधारणे आणि प्रश्नांच्या राजकारणावर उभे राहणे हा माझा धर्म आहे. मी आजपर्यंत कोणाशीही वैयक्तिक भांडण केले नाही.

    ते पुढे आपल्या वक्तव्यात म्हणाले, ‘मी ना हायकमांडला दिशाभूल करू शकतो आणि ना दिशाभूल होऊ देतो. न्यायासाठी लढण्यासाठी, पंजाबमधील लोकांचे जीवन सुधारण्यासाठी मी काहीही बलिदान देईन. यासाठी मला काही विचार करण्याची गरज नाही. ” व्हिडिओच्या शेवटी सिद्धू यांनी शेरही ऐकवला, “उसूलों पर आंच आए तो टकराना जरूरी है, अगर जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी है.”

    Navjot Singh Sidhu shared new video said No personal rivalry with anyone in punjab congress

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक