विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: कॉँग्रेसचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू अखेर प्रदेशाध्यक्ष पदावर राहण्यास राजी झाले आहेत. मात्र, यासाठी पंजाबच्या पोलीस महासंचालकांचा बळी द्यावा लागणार आहे. त्याबरोबरच २०१७ मध्ये कॉँग्रेसने दिलेल्या आश्वासनांची काय प्रगती झाली यासाठी मुख्यमंत्री मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह हरिश चौधरी यांची समिती नेमण्याचा निर्णय झाला आहे.Navjot Singh Sidhu finally agrees, DGP to be victimized, three-member committee to look into promises
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कॅबिनेट, राज्य पोलीस प्रमुख आणि महाधिवक्ता यांच्या निवडीत मत विचारात घेतले नसल्याने सिध्दू यांनी सोमवारी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून कॉँग्रेसमध्ये तणावाचे वातावरण आहे. मुख्यमंत्र्यांनी नाराज सिध्दू यांच्याशी संपर्क साधून तडजोड सुरू केली होती.
मुख्यमंत्री चन्नी आणि सिद्धूंची आज दुपारी बैठक झाली. ही बैठक ६ वाजता संपली. जवळपास दोन तास ही बैठक चालली. नवज्योत सिंग सिद्धू यांचे मन वळवण्यासाठी पंजाबचे डीजीपी आणि एजी बदलण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तीन सदस्यांची समिती आठवड्यातून दोनदा प्रमुख मुद्द्यांवर बैठक घेईल. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नवज्योत सिंग सिद्धू आणि हरीश चौधरी हे या समितीमध्ये असतील.
आयपीएस अधिकारी इकबाल प्रीत सिंग साहोटा यांची पंजाबच्या पोलिस महासंचालपदाची नियुक्ती केली गेली. त्यांच्या नियुक्तीवरून नवज्योत सिंग सिद्धू हे नाराज आहेत. फरीदकोटमध्ये गुरु ग्रंथ साहिब अवमान प्रकरणी झालेल्या घटनांच्या चौकशीसाठी तत्कालीन अकाली दलाच्या सरकारने २०१५ मध्ये समिती नेमली होती. या चौकशी समितीचे साहोटा हे प्रमुख होते.
बैठकीनंतर कॉँग्रेस पक्षश्रेष्ठींचे दूत सल्लागार मोहम्मद मुस्तफा म्हणाले की, सिद्धू कधीकधी भावनिकपणे वागतात. पण काँग्रेस नेतृत्वाने सिध्दू यांना समजून घेतले आहे. याचे कारण ते म्हणजे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग नाहीत, ज्यांना कधीच काँग्रेस आणि त्यांच्या नेतृत्वाची काळजी नव्हती.
चन्नी राज्याचे पहिले दलित मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यानिवडीचे लोक स्वागत करत आहेत. पुढील वर्षीच्या राज्य निवडणुकीपूर्वी कॉंग्रेससाठी ते गेमचेंजर ठरतील.सिध्दू यांनी काल एका व्हिडीओ संदेशात म्हटले होते की, माझा लढा हा मुद्यांवर आहे. माझ्या नैतिकतेशी तडजोड करू शकत नाही. मी हायकमांडची दिशाभूल करू शकत नाही.
Navjot Singh Sidhu finally agrees, DGP to be victimized, three-member committee to look into promises
महत्त्वाच्या बातम्या
- महापौर किशोरी पेडणेकर : दोन डोस घेऊनही केईएम रुग्णालयात २२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
- पुण्यात कोरोनाविरोधी लस आहे; पण, सिरींज नाहीत १७ हजार डोस उपलब्ध असताना द्यायचे ते कसे ?; महापालिका प्रशासनापुढे मोठा पेच
- गोव्यात काँग्रेस परिवार एकत्र, पण मतांची मात्र विभागणी!!; मग पराभव कुणाचा?
- राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत त्वरित द्या नवनीत राणांनी यांचा केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे आग्रह