• Download App
    Navin Nabin

    नितीन नवीन बॉस, मी कार्यकर्ता; पंतप्रधान मोदींनी एका वाक्यात अधोरेखित केला भाजप मधला Generational Change!!

    नाशिक : नितीन नवीन माझे बॉस आहेत. मी कार्यकर्ता आहे, अशा एका वाक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप मधला पिढीचा बदल म्हणजे Generation Change अधोरेखित केला. त्याचवेळी त्यांनी भाजप मधल्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना नव्या नेतृत्वाखाली काम करावे लागेल, असा संदेश तर दिलाच, त्याच बरोबर राष्ट्रीय लोकशाही या गाडी अर्थातच NDA मधल्या घटक पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांना सुद्धा नितीन नवीन हेच आता तुमचेही बॉस आहेत, असा स्पष्ट इशारा दिला.

    नितीन नवीन यांनी आज भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे सर्व पूर्व अध्यक्ष यांनी पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर जेपी नड्डा आणि मोदी यांचे भाषण झाले.

    – मोदींच्या भाषणातले Between the Lines

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या भाषणामध्ये बरेच Between the Lines होते. एकीकडे सरकार आपल्या गतीने चालेल आणि त्याच वेळी पक्ष नव्या नेतृत्वाखाली अधिक गतीने वाढेल, हा संदेश मोदींच्या भाषणात होता.

    – टीम सुद्धा नाही,

    45 वर्षांच्या नितीन नवीन यांची भाजपची नवी टीम ही सुद्धा 45 ते 55 या वयोगटातील असेल. त्यामुळे भाजपमध्ये पुढच्या पिढीकडे नेतृत्व सोपविले जाईल. ही प्रक्रिया लवकरात लवकर गतिमान करून ती पूर्णत्वाला सुद्धा नेली जाईल. त्याचवेळी सरकारमध्ये सुद्धा शांतपणे, पण स्थिर बदल केले जातील. त्यासाठी कुणी उगाच माध्यमांमध्ये जाऊन आरडाओरडा करणार नाही आणि माध्यमांनी केलेला आरडाओरडा सुद्धा उपयोगी पडणार नाही.

    – पहिली लिटमस टेस्ट

    भाजपला 2029 च्या निवडणुकीसाठी तयार करायचे असल्याने त्याची पायाभरणी 2025 च्या उत्तरार्धापासून ते 2026 च्या सुरुवातीपर्यंत केली. नितीन नवीन यांच्याकडे त्या मजबूत पायावर नवा कात टाकलेला पक्ष पुढच्या काही महिन्यांमध्ये उभा करायची जबाबदारी असेल. 2026 मधल्या पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, हुदुचेरी या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांसाठी नितीन नवीन यांचे नेतृत्व तर असेलच, पण त्याबरोबरच त्यांच्या दिमतीला एक नवी टीम आणि त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळातले अनुभवी साथीदार सुद्धा असतील. त्यामुळे नितीन नवीन यांच्या नेतृत्वाची पहिली लिटमस टेस्ट चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये घेतली जाईल. पण याचा अर्थ या लिटमस टेस्टमध्ये नितीन नवीन समजा पुरेसे यशस्वी ठरले नाहीत, तर लगेच त्यांना कोणी बदलून टाकणार नाही. कारण भाजपमध्ये असे घाईगर्दीत निर्णय घेतले जात नाहीत.



    – नव्या पिढीच्या नेतृत्वाची प्रस्थापना

    चार राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांची रणनीती भाजपचे वरिष्ठ नेतेच ठरवतील किंबहुना त्यांनी ती ठरवली आहे. पण तिची अंमलबजावणी मात्र नितीन नवीन आणि त्यांची नवी टीम करेल. यातून भाजपच्या नव्या पिढीचे नेतृत्व टप्प्याटप्प्याने प्रस्थापित केले जाईल. अधिकार आणि जबाबदारी यांचा व्यवस्थित समन्वय राखण्यात येईल.

    – NDA चे सुद्धा बॉस

    राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या (NDA) घटक पक्षांमध्ये सुद्धा मोदींनी आजच्या भाषणातून व्यवस्थित संदेश आणि इशारा पोहोचवलाय. नितीन नवीन हे माझे बॉस आहेत, याचा अर्थ ते तुमचेही बॉस आहेत. इथून पुढे तुम्हाला त्यांच्याशी समन्वय साधून काम करावे लागेल. याचाच पुढचा अर्थ भाजपच्या नवीन पिढीशी तुमचा सुसंवाद वाढवावा लागेल. त्यासाठी भाजप सारख्याच नवीन गोष्टी तुम्हाला सुद्धा कराव्या लागतील, हे मोदींनी अप्रत्यक्षपणे भाषणातून सांगितले. तशी राजकीय कृती तर त्यांनी आधीपासूनच सुरू केली आहे. चंद्राबाबू नायडूंचे पुत्र नारा लोकेश आणि एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर त्यांचे “विशेष लक्ष” असल्याचे त्यांनी राजकीय कृतीतून अधोरेखित केले आहे. त्या पलीकडे जाऊन आज स्पष्ट शब्दांमध्ये नितीन नवीन हे माझे बॉस आहेत, याचा अर्थच ते तुमचेही बॉसच आहेत, हेच राजकीय वास्तव त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या (NDA) घटक पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांनाही सूचित केले.

    Navin Nabin New president of BJP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    IMF : IMF ने भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज वाढवून 7.3% केला; म्हटले- भारताचा विकास दर अपेक्षेपेक्षा चांगला, पुढील वर्षीही अर्थव्यवस्थेत तेजी राहील

    फालतू बातम्यांच्या पुड्या सोडून मुंबईतल्या भाजपच्या महापौराला रोखता येणार आहे का??

    Nitin Nabin : नितीन नबीन भाजपचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष, बिनविरोध निवड; शहा-नड्डा नामांकनाला उपस्थित