ओडिशा म्हणजे कालीहंडीतील भुकबळी, देशातील सर्वाधिक गरीब राज्य अशी ओळख एकेकाळी होत. मात्र, ओडिशाने गेल्या २० वर्षांत ही ओळख बदलली आहे. आता ओडिशाचे संकटाशी लढण्याचे मॉडेल संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेत आहेत. एकाच वेळी चक्रीवादळाचा तडाखा आणि कोरोना यांच्याशी ओडिशा समर्थपणे लढा देत आहे. पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत देशापुढे अनेक समस्या असताना आम्हाला मदत नको असे सांगून ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी देशवासियांची मने जिंकली आहेत.Naveen Patnaik changed Odisha’s identity, from poorest state to successful crisis, now home warrior to fight disaster
विशेष प्रतिनिधी
कटक : ओडिशा म्हणजे कालीहंडीतील भुकबळी, देशातील सर्वाधिक गरीब राज्य अशी ओळख एकेकाळी होत. मात्र, ओडिशाने गेल्या २० वर्षांत ही ओळख बदलली आहे. आता ओडिशाचे संकटाशी लढण्याचे मॉडेल संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेत आहेत.
एकाच वेळी चक्रीवादळाचा तडाखा आणि कोरोना यांच्याशी ओडिशा समर्थपणे लढा देत आहे. पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत देशापुढे अनेक समस्या असताना आम्हाला मदत नको असे सांगून ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी देशवासियांची मने जिंकली आहेत.
नवीन पटनाईक यांनी नुकतीच मंत्रीमंडळाची बैठक घेतली. चक्रीवादळ, कोरोना किंवा भविष्यातील कोणत्याही संकटाशी लढण्यासाठी घरघरात योध्दा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्रीमंडळाच्या प्रस्तावात म्हटले आहे की आता कोरोनाचा एक वास्तव म्हणून स्वीकार करायला हवा. त्याचबरोबर चक्रीवादळासारखी संकटेही येत राहतील. यासाठी आपल्या नागरिकांना तयार करावे लागेल. याचे कारण म्हणजे संकट कधी येईल ते सांगता येत नाही.
दुसरे म्हणजे नव्या संकटाचे स्वरुप काय असेल हे देखील समजत नाही. त्यामुळे नागरिकांना माहिती देण्यासाठी पायाभूत सुविधा उभ्या करण्यात येणार आहे. प्रत्येक नागरिक हा योध्दा असेल जो कोणत्याही संकटाशी लढण्यास तयार असेल. प्रत्येक घरात एक योध्दा तयार केला जाईल.
सरकारच्या वतीने प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला आपत्कालीन परिस्थितीत लढण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीशी लढण्याबरोबरच महामारीचा मुकाबला करण्याचे शिक्षण देण्यात येणार आहे.
शासकीय नोकरीसाठी आपत्कालीन प्रशिक्षण हे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यासाठी मिशन शक्ती नावाने ग्रुप तयार करण्यात येणार आहे. वनसुरक्षा समित्यांना सक्षम करण्यात येईल.
पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत नवीन पटनाईक म्हणाले होते, देश करोना संकटाचा सामना करत आहे. अशा परिस्थिती तातडीची आर्थिक मदत मागून आम्हाला केंद्र सरकावर कुठलाही बोजा टाकायचा नाही.