विशेष प्रतिनिधी
नाशिक : महाराष्ट्रातल्या राजकीय गदारोळात नवीन पटनायक मुंबईत आले आणि इथल्या उद्योगपतींना शांतपणे भेटून गेले!!… हो, हे घडलंय कालच… 14 सप्टेंबर 2022 ला!! Naveen Patnaik arrived in Mumbai, met businessmen quietly
“मेक इन इंडिया”च्या धर्तीवर ओरिसा राज्यात सुरू केलेल्या “मेक इन ओरिसा” मोहिमेत ओरिसा इन्व्हेस्टर मिटसाठी ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक काल मुंबईत आले होते. त्यांनी ओरिसा शासनातर्फे काही ज्येष्ठ उद्योगपतींच्या भेटीगाठी घेतल्या. संध्याकाळी विविध उद्योग क्षेत्रांच्या 300 वरिष्ठ प्रतिनिधींना त्यांनी संबोधित केले. त्यांना ओरिसातील गुंतवणुकीसाठी निमंत्रण दिले. ओरिसा शासनाचे “इज ऑफ डूइंग बिजनेस” हे धोरण समजावून सांगितले. ओरिसात नोव्हेंबर 2022 च्या अखेरी इन्व्हेस्टर मिट आहे..
महाराष्ट्रात राजकीय गदारोळ
नवीन पटनायकांच्या सुरुवातीच्या भेटीगाठींमध्ये आनंद महिंद्रा यांचा प्रमुख समावेश होता. महाराष्ट्रात सध्या वेदांत – फॉक्सकॉन सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प गुजरातला गेल्याच्या मुद्द्यावरून मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. महाविकास आघाडीचे नेते विरुद्ध शिवसेना भाजपचे नेते असा जोरदार राजकीय सामना रंगला आहे. त्याच्याच बातम्या सर्व माध्यमे देत आहेत. या राजकीय गदारोळात महाराष्ट्रातले नेते आणि बातम्यांच्या गर्दीत मराठी माध्यमे नवीन पटनायक यांची मुंबई भेट विसरूनच गेले. पटनायक यांनी मुंबईत येऊन आनंद महिंद्रा यांच्यासारख्या अनेक वरिष्ठ उद्योगपतींची भेट घेतली. या बातमीची दखल मराठी माध्यमांनी घेतली नाही.
आनंद महिंद्रांचे ट्विट
पण या भेटीनंतर आनंद महिंद्रा यांनी जे ट्विट केले आहे, ते फारच बोलके आणि महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर “सटीक भाष्य” करणारे आहे. त्यांनी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे वर्णन करताना, एक अतिशय शांत, निगर्वी आणि शब्दांपेक्षा प्रत्यक्ष कृतीने बोलणारे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना भेटून विशेष आनंद झाला, अशा शब्दांनी त्यांचा गौरव केला आहेच. पण त्याचबरोबर ओरिसात त्यांनी लागू केलेले आपत्ती निवारण व्यवस्थापनाचे मॉडेल ही खऱ्या अर्थाने त्यांची “वारसा देणगी” असेल, असे ट्विटमध्ये आवर्जून नमूद केले आहे.
वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर निर्मिती प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात मध्ये गेल्यामुळे महाराष्ट्रातले राजकीय नेते आपापसात वाद घालत आहे. त्याचवेळी ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक मुंबईत येऊन अनेक उद्योगपतींना भेटतात, त्यांना ओरिसा इन्व्हेस्टर मिटचे आणि मेक इन ओरिसा कार्यक्रमाचे निमंत्रण देतात आणि त्यांच्याविषयी आनंद महिंद्रांसारखे ज्येष्ठ उद्योगपती अतिशय सटीक शब्दांमध्ये भाष्य करतात, याला विशेष महत्त्व आहे. आनंद महिंद्रा यांचे ट्विट खरंच मूळातून वाचण्यायोग्य आणि महाराष्ट्रातील नेत्यांनी अनुकरण करण्यायोग्य आहे!!
Naveen Patnaik arrived in Mumbai, met businessmen quietly
महत्वाच्या बातम्या
- वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प : सुभाष देसाई आधी काय म्हणाले?, आज काय म्हणाले?; नितेश राणेंनी केले ट्विट!!
- ईडीची धडक कारवाई : मुंबईतल्या झवेरी बाजारातून तब्बल 92 किलो सोन्यासह 330 किलो चांदी जप्त!
- मुंबईसह सर्व महापालिकांमध्ये मनसे, तर ग्रामीण भागात शेट्टींची स्वाभिमानी स्वतंत्र लढणार!!
- सांगलीत 4 साधूंना मारहाण : फडणवीसांचा रशियातून पोलीस महासंचालकांना फोन; मागविला रिपोर्ट!!