• Download App
    भारताच्या नौदलाला आता अमेरिकेची ताकद, ‘सीहॉक’ , ‘पोसेडॉन’ होणार ताफ्यात दाखल Nave gets new war planes

    भारताच्या नौदलाला आता अमेरिकेची ताकद, ‘सीहॉक’ , ‘पोसेडॉन’ होणार ताफ्यात दाखल

    प्रतिनिधी

    वॉशिंग्टन – अमेरिकेच्या नौदलाकडून भारतीय नौदलाला दोन एमएच-६० आर सीहॉक हेलिकॉप्टर आणि एक पी-८ पोसेडॉन हे गस्ती विमान मिळणार आहे. हे एकूण दहावे पोसेडॉन विमान असेल. भारतीय नौदलाने लॉकहिड मार्टिन कंपनीकडून दोन अब्ज ४० कोटी डॉलर किमतीला एकूण २४ एमएच-६० आर हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार केला आहे. Nave gets new war planes



    गेल्याच आठवड्यात अमेरिकेच्या नौदलाकडून भारतीय नौदलाकडे ही हेलिकॉप्टर आणि विमाने हस्तांतरीत करण्याचा कार्यक्रम सॅनडिएगो येथे झाला होता. ही दोन्ही हेलिकॉप्टर आणि विमान गोव्यात तैनात असतील. एमएच-६० आर सीहॉक हे बहुउद्देशीय आणि सर्व प्रकारच्या वातावरणात उपयुक्त ठरणारे हेलिकॉप्टर आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले हे हेलिकॉप्टर अनेक प्रकारच्या मोहिमांमध्ये नौदलाला साथ देऊ शकते. भारतात आणल्यानंतरही त्यामध्ये काही सुधारणा केली जाणार आहे. या हेलिकॉप्टरसाठीच्या वैमानिकांची पहिली तुकडी सध्या अमेरिकेत प्रशिक्षण घेत आहे.

    पी-८ पोसेडॉन विमान देऊनही अमेरिकेने भारताबरोबरील आपले संरक्षण संबंध अधिक मजबूत केले आहेत. हे गस्ती विमान वापरणारा भारत हा अमेरिकेनंतरचा केवळ दुसराच देश आहे.

    Nave gets new war planes

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Dalai Lama : दलाई लामांचा पुनर्जन्म ‘स्वतंत्र देशात’ होईल; धर्मशाळामध्ये तिबेटी धार्मिक परिषद: चीनचा हस्तक्षेप फेटाळला, उत्तराधिकारावर स्पष्ट संदेश दिला

    Sreelekha Thiruvananthapuram : केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर होण्याची शक्यता; तिरुवनंतपुरममधून श्रीलेखा विजयी; राज्यातील पहिल्या महिला IPS अधिकारी

    Goa Nightclub : गोवा अग्निकांड- जेवण करायला बाहेर पडले आणि लूथरा बंधूंना पकडले; थायलंडमध्ये हद्दपारीची प्रक्रिया सुरू