• Download App
    जगभरात नाटू नाटूची धूम; ऑस्कर जिंकल्यावर अभिनंदनाचा वर्षाव; पण लूटो लूटो करून काँग्रेस कडून खिल्ली!!Natu Natu boom around the world; Congratulation after winning an Oscar

    जगभरात नाटू नाटूची धूम; ऑस्कर जिंकल्यावर अभिनंदनाचा वर्षाव; पण लूटो लूटो करून काँग्रेस कडून खिल्ली!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आर आर आर सिनेमातल्या नाटू नाटू गाण्याने संपूर्ण जगाला वेड लावले आहे. जगात त्या गाण्याची धूम आहे आणि त्या गाण्याने ऑस्कर पुरस्कार जिंकल्यावर तर, भारतात सर्वत्र आनंदाचे उधाण आले आहे. असे असताना काँग्रेसला मात्र त्याचे फार वाईट वाटल्याचे दिसत आहे. कारण सगळीकडून नाटू नाटू वर अभिनंदनचा वर्षाव होत असताना काँग्रेसने मात्र लूटो लूटो म्हणत त्या गाण्याची खिल्ली उडवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर निशाणा साधला आहे. Natu Natu boom around the world; Congratulation after winning an Oscar

    कुठल्याही जगप्रसिद्ध गोष्टीवर मीम्स तयार करणे याचा सर्वसामान्य बाब आहे. रोज अशी लाखो करोडो मीम्स तयार होत असतात. नाटू नाटू वर काँग्रेसने तयार केलेले हे मीम अशा लाखो करोडो मीम्स सारखेच असले तरी त्यातली भावना मात्र जगात आणि भारतात नाटू नाटू वर व्यक्त झालेल्या भावनांच्या विपरीत आहे.

    या गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉंगचे ऑस्कर पारितोषिक मिळाले आहे. पण काँग्रेसने मात्र त्याची खिल्ली उडवताना मीम्स मध्ये नटांचे फोटो मॉर्फ करून त्यावर मोदी आणि अदानींचे चेहरे चिकटवले आहेत. भारतातल्या आणि जगातल्या व्यक्त झालेल्या भावनांच्या विपरीत काँग्रेसने हे मीम्स बनवल्याबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर त्या पक्षाला घेरले आहे.

    Natu Natu boom around the world; Congratulation after winning an Oscar

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    yogi adityanath : मणिकर्णिका वादावर योगी म्हणाले- काशीला बदनाम करण्याचा कट; AI व्हिडिओमुळे काँग्रेसने दिशाभूल केली, त्यामुळे मला यावे लागले

    Sambit Patra : भाजपने म्हटले-₹10 हजारात बांगलादेशी-रोहिंग्यांना नागरिकत्व देत आहेत ममता, म्हणूनच ईडीच्या धाडीने घाबरल्या

    Modi : मोदी म्हणाले- TMC घुसखोरांना मतदार बनवत आहे; यांना वसवून गरिबांचा हक्क हिरावला जात आहे, भाजप यांना देशाबाहेर काढेल