वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्याबरोबरच आम आदमी पार्टीला राष्ट्रीय दर्जा बहाल केला आहे. या आनंदाच्या क्षणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगवासी मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन या आपल्या दोन मंत्र्यांची आठवण झाली आहे. हे दोन्ही मंत्री दिल्लीतील दारू घोटाळ्यातील वेगवेगळ्या आरोपांखाली सध्या तिहार तुरुंगात आहेत. National status to Aam Aadmi Party
मात्र आम आदमी पार्टीला त्या पक्षाच्या निवडणूक परफॉर्मन्सच्या आधारे निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दर्जा बहाल केला आहे. आम आदमी पार्टीची दिल्ली राज्य, दिल्ली महापालिका आणि पंजाब राज्य या तीन ठिकाणी सत्ता आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्याबरोबर एकापेक्षा अधिक राज्यांमध्ये सत्ता असलेला आम आदमी पार्टी हा एकमेव पक्ष आहे. या पक्षाची मतांची टक्केवारी आणि लोकप्रतिनिधित्व या निकषांवर त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे.
या पार्श्वभूमीवर एका समारंभात बोलताना अरविंद केजरीवाल यांना मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन या दोन तिहार तुरुंगात असलेल्या मंत्र्यांची आठवण झाली आहे. आजच्या आनंदाच्या क्षणी मनीषजी आणि जैन साहेब आपल्याबरोबर हवे होते. ते बाहेर असते तर आपल्या आनंदाला चार चांद लागले असते. पण ते आपल्यासाठी संघर्ष करत आहेत. देशासाठी संघर्ष करत आहेत आणि ज्या पक्षांना देशाची प्रगती विकास नको आहे ते सगळे देशद्रोही पक्ष आम आदमी पार्टीला विरोध करत आहेत, असे उद्गार केजरीवाल यांनी काढले आहेत.
दिल्ली दारू घोटाळ्याच्या तारा आता फक्त दिल्लीतच बाहेर आलेल्या नसून त्या तेलंगणा आणि महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. ईडी आणि सीबीआय या दोन केंद्रीय तपास यंत्रणांनी या दोन राज्यांमध्ये काही ठिकाणी छापे घालून काही बड्या नेत्यांची चौकशी आणि तपास केले आहेत. ही कायदेशीर प्रक्रिया निरंतर सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पात्र पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यासाठी त्यांनी आम आदमी पार्टीचे मतदार कार्यकर्ते नेते यांचे आभार मानले आहेत. पण त्याचवेळी त्यांनी तिहार तुरुंगवासी मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांची आवर्जून आठवण काढली आहे.
National status to Aam Aadmi Party
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादी – तृणमूळ – कम्युनिस्ट : संकुचित दृष्टी, आकुंचित पक्ष; राष्ट्रीय दर्जापासून ढळले नेतृत्व!!
- कर्नाटक भाजपकडून स्टार कँपेनर्सच्या डिमांडमध्ये योगी, जयशंकर, हेमंत विश्वशर्मा टॉपवर; जयशंकर तर सरप्राईज एलिमेंट!!
- पवार, ममतांचा गेला राष्ट्रीय दर्जा; काँग्रेससाठी आले आनंदाचे भरते
- मुलींसाठी वरदान ठरलेल्या सुकन्या समृद्धी योजनेतून अधिक लाभ मिळणार; मोदी सरकारने वाढवला व्याज दर!