• Download App
    नॅशनल हेरॉल्ड मनी लाँड्रिंग प्रकरण : ईडीकडून सोनिया यांची अडीच तास चौकशी, २५ जुलैला पुन्हा बोलावले|National Herald Money Laundering Case ED questions Sonia for 2-and-a-half hours, resumes on July 25

    नॅशनल हेरॉल्ड मनी लाँड्रिंग प्रकरण : ईडीकडून सोनिया यांची अडीच तास चौकशी, २५ जुलैला पुन्हा बोलावले

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) गुरुवारी नॅशनल हेरॉल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधींची सव्वा २ तास चौकशी केली. त्यांना दुसऱ्या टप्प्यातील चौकशीसाठी २५ जुलै रोजी पुन्हा बोलावले आहे. नुकतेच कोरोनातून बरे झाल्यानंतर सोनिया गांधी ईडी मुख्यालयात दुपारी १२.०० वाजता पोहोचल्या. साडेबारा वाजता चौकशी सुरू झाली.National Herald Money Laundering Case ED questions Sonia for 2-and-a-half hours, resumes on July 25

    सोनियांनी २७ ते २८ प्रश्नांची उत्तरे दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या विनंतीनुसार चौकशी लवकर संपवण्यात आली. काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख जयराम रमेश म्हणाले, सोनिया गांधी यांनी अस्वस्थता आणि विनंती केल्यामुळे चौकशी संपवल्याचे वृत्त निराधार आहे. ईडीकडे आणखी प्रश्नच नव्हते. सोनिया गांधी रात्री ८-९ वाजेपर्यंत चौकशीस तयार होत्या. सोनियांना सांगण्यात आले की, त्यांना २६ जुलै रोजी बोलावण्याचे समन्स द्यायचे होते, आता त्यांच्या सांगण्यावरून एक दिवस आधी समन्स देत आहोत.



    राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांच्या घरावर ईडीची टाच

    राष्ट्रवादी काँग्रसचे सरचिटणीस व राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या वरळीतील सीजे हाऊसमधील चौथ्या मजल्यावरील घरावर गुरुवारी ‘ईडी’ने (सक्तवसुली संचालनालय) टाच आणली. इक्बाल मिरची प्रकरणी ही कारवाई झाली आहे. यासंबंधित पटेलांची चौकशीही झाली होती. वरळीतील सीजे हाऊसमधील दुसऱ्या मजल्यावर आधीच ईडीने कारवाई केली होती. गुरुवारी दुपारी ईडीचे अधिकारी येथे आले होते. त्यांनी चौथा मजला सील केला.

    National Herald Money Laundering Case ED questions Sonia for 2-and-a-half hours, resumes on July 25

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली