वृत्तसंस्था
नवी दिल्ली – कोविड संकटाच्या काळात ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलांच्या मदतीसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन नंबर्स जारी करण्यात आले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व खासगी वाहिन्यांना आणि सोशल मीडिया यूजर्सना हे हेल्पलाइन नंबर्स शेअर करण्यास सांगितले असून लोकांचे मानसिक आरोग्य टिकविण्यासाठीही सल्लासेवेसारखी मदतही केली जाणार आहे. National Helpline no. of Health & Family Welfare Ministry announced
कोविडच्या संकटकाळात अफवा पसरविण्याचे प्रमाण अधिक झाले आहे. या पार्श्वभऊमीवर सरकारी पातळीवरची माहिती नेमक्या स्वरूपात पोहोचावी. गरजू व्यक्तींना योग्य आणि अपेक्षित अशी मदत व्हावी, या हेतूने राष्ट्रीय हेल्पलाइन नंबर्स तयार करण्यात आले आहेत. ते आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, महिला आणि बाल कल्याण मंत्रालय, सामाजिक न्याय मंत्रालय यातील हे नंबर्स आहेत.
कोविडच्या संकटात जनतेचे मानसिक आरोग्य टिकविण्यासाठी विशेष सल्ला सेवाही सरकारतर्फे देण्यात येत आहे. त्यासाठी राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि मेंदूविकार राष्ट्रीय संस्थेचा हेल्पलाइन नंबर शेअर करण्यात आला आहे.