• Download App
    National General Secretary B. L.Santosh name for the post of Chief Minister of Karnataka, four Deputy Chief Ministers from four communities

    कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रीय सरचिटणिस बी. एल. संतोष यांच्या नावाची चर्चा, चार समाजातील चार उपमुख्यमंत्री देणार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. आता भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून राष्टीय सरचिटणिस बी. एल. संतोष यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस होत आहे. भाजपा संघटनेतील सर्वात महत्वाचे पद असलेल्या राष्ट्रीय सरचिटणिस (संघटन) या पदावर सध्या बी.एल. संतोष कार्यरत आहेत. त्याचबरोबर चार समाजातील चार नेत्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. National General Secretary B. L.Santosh name for the post of Chief Minister of Karnataka, four Deputy Chief Ministers from four communities

    कर्नाटकातील लिंगायत समाजाचे नेते असलेले येडियुरप्पा ७८ वर्षांचे आहेत. आपल्या मुख्यमंत्रीपदी ठेवायचे किंवा नाही याचा निर्णय पक्षाचे नेतृत्वच घेईल, असे त्यांनी म्हटले होते. रविवारी सायंकाळपर्यंत मला पक्षाच्या नेत्यांकडून निरोप मिळेल. त्यानंतर सोमवारी निर्णय जाहीर केला जाईल, असे त्यांनी म्हटले होते.

    संतोष यांच्याबरोबरच पक्षाकडून उपमुख्यमंत्री आणि लिंगायत समाजाचे दुसरे नेते लक्ष्मण सुवाडी हे देखील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. राज्यात १५ टक्यांहून अधिक असलेल्या लिंगायत समाजातील सुवाडी यांचे नाव आघाडीवर आहे.भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की सोमवारी येडियुरप्पा आमदारांची बैठक घेतील. प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा देत असल्याचे जाहीर करतील.



    बी. एल. संतोष हे ब्राम्हण समाजाचे आहेत. कर्नाटकात ब्राम्हण समाज केवळ दोन टक्के आहे. त्यामुळे जातीय समीकरण संतुलित ठेवण्यासाठी चार उपमुख्यमंत्रीपदेही निर्माण केली जातील. यामध्ये लिंगायत, वोक्कालिग, ओबी आणि एस-एसटी समुदायाला स्थान देण्यात येईल.

    संभाव्य उपमुख्यमंत्र्यांत लक्ष्मण सुवाडी यांचे नाव कायम राहण्याची शक्यता आहे. वोक्कालिगा समुदायाचे सी. एन. अश्वथ नारायण यांची जागा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि नुकतेच केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिलेलेले सदानंद गौडा यांना आणले जाऊ लागेल. ओबीसी मराठा समाजातील कारवारमधील आमदार रुपाली नाईक यांनाही उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातून कोणाल उपमुख्यमंत्रीपद मिळेल, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. 26 जुलै नंतर एक-दोन दिवसात नवीन मुख्यमंत्री शपथ घेतील, असेही बोलले जात आहे.

    National General Secretary B. L.Santosh name for the post of Chief Minister of Karnataka, four Deputy Chief Ministers from four communities

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!