विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – तालिबानच्या अफगाणिस्तानमधील विजयाचा भारतात जल्लोष करणाऱ्या समर्थकांना ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी फटकारले आहे.त्यांनी एक चित्रफीत सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. संवादासाठी त्यांनी उर्दू भाषेची निवड केली आहे.Nasruddin Shah targets pro talibani people
त्यात ते म्हणतात की, मी एक भारतीय मुसलमान आहे आणि मिर्झा गालिब यांनी अनेक वर्षांपूर्वी म्हटल्याप्रमाणे ईश्वराबरोबरील माझे नाते अनौपचारिक आहे. त्यासाठी मला कोणत्याही राजकीय धर्माची गरज नाही.
तालिबानच्या पुनरागमनाचा जल्लोष करणाऱ्यांसाठी माझा एक संदेश आहे. हिंदुस्थानी इस्लाम आणि जगाच्या इतर भागांत पाळला जाणारा इस्लाम यांत फरक आहे. तालिबानचे सत्तेवर परतणे साऱ्या जगासाठी चिंतेचे कारण आहेच,
पण काही भारतीय मुस्लिमांच्या गटाने असा आनंद साजरा करणे सुद्धा कमी धोकादायक नाही. अशा व्यक्तींनी स्वतःलाच प्रश्न विचारावा. आपल्याला प्रगत, आधुनिक इस्लाम हवा की गेल्या काही शतकांमधील जुनाट रानटी पद्धतीनेच जगायचे हे त्यांनी ठरवावे.
Nasruddin Shah targets pro talibani people
महत्त्वाच्या बातम्या
- जीडीपीनंतर जीएसटीचीही घौडदौड, सलग दुसऱ्यांदा जीएसटी महसूल एक लाख कोटींवर
- असेही महिला सक्षमीकरण, महिला सरपंचाकडे ११ कोटींची माया, एक एकराचा स्विमींग पूल असलेला बंगला
- पैसे केंद्रांचे आणि विज्ञान अविष्कार नगरीला राजीव गांधींचे नाव, रतन टाटा यांचे नाव देण्याची पिंपरी-चिंचवडकरांची मागणी
- राफेलचे लॅँडींग झाले पण राहूल गांधींचे टेक ऑफ होऊ शकले नाही, राफेलचा आनवश्यक मुद्दा उचलल्याचा परिणाम, राजनाथ सिंह यांची टीका