वृत्तसंस्था
कॅलिफोर्निया – ‘नासा’ने मंगळावर उतरविलेल्या पर्सिव्हरन्स रोव्हरला या ग्रहाच्या पृष्ठभागावर दगडाचा पहिला नमुना गोळा करण्यात यश आले आहे. दगडाचा हा पेन्सिलपेक्षा तो थोडा जाड आहे. अशा प्रकारे दगडाचे आणखी नमुने गोळा केल्यानंतर ते सर्व शास्त्रज्ञांच्याो संशोधनासाठी पृथ्वीवर आणले जाणार आहेत.NASA gots stone on Mars
मंगळाच्या पृष्ठभागावरून दगडाचा नमुना उचलल्यानंतर त्याचे मोजमाप घेण्यासाठी व छायाचित्रणासाठी पर्सिव्हरन्सने नलिका रोव्हरच्या अंतर्गत भागात पाठविला व नंतर हवाबंद भागात सील केला.
‘‘ हे अत्यंत महत्त्वपूर्ण यश आहे.
पर्सिव्हरन्सने आणि आमच्याभ चमूने लावलेला हा शोध पाहण्यासाठी मी अधीर झालो आहे,’ असे उद्गािर ‘नासा’चे प्रशासकीय अधिकारी बिल नेल्सन यांनी काढले. सहा महिन्यांपूर्वी पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळावरील दगडाचा नमुना गोळा करण्याचा प्रयत्न केला होता.
या सर्व उपकरणे कार्यरत असूनही पर्सिव्हरन्सच्या नलिकेत नमुना पोहचू शकला नव्हता. यानंतर ‘नासा’ने दुसऱ्या जागेवरून दगडाचा नमुना गोळा करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. अखेर जेझिरो विवराजवळील नमुना गोळा करण्यात यश आले आहे.
पर्सिव्हरन्सची नमुने गोळा करण्याची व त्याचा साठा करण्याची यंत्रणा ही अवकाशात पाठविलेली सर्वांत गुंतागुंतीची यंत्रणा असून या यंत्रणेत तीन हजारपेक्षा जास्त सुटे भाग जोडलेले आहेत.
NASA gots stone on Mars
महत्त्वाच्या बातम्या
- डोंबिवलीत पाण्यापाई तरुणीचा हात मोडला कल्याण-डोंबिवलीत २७ गावे तहानलेली
- दोन प्रौढ व्यक्तींना धर्माचा विचार न करता जोडीदार निवडण्याचा अधिकार, अलाहाबाद हायकोर्टाचा निर्वाळा
- फौजदारी खटल्यांची चुकीची माहिती देणे महागात पडणार, सुप्रीम कोर्टाची कठोर भूमिका, अशा कर्मचाऱ्यांना नियुक्तीचा हक्क नाही
- मोठी बातमी : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासोबतच काँग्रेस पक्षाचाही राजीनामा देऊ शकतात कॅप्टन अमरिंदर; पंजाब काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप