विशेष प्रतिनिधी
सोलापूर : एक हजार टक्के उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र येणार हे आज तुम्हाला सांगतो. आपला अंदाज चुकणार नाही. दिवस कुठला ते बघावे लागेल, असा दावा शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.Narendra Modi-Uddhav Thackeray will come together; Shahaji Patal’s statement is discussed across the state
दरम्यान शहाजी बापू पाटील पुढे बोलताना म्हणाले की, हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवता येणार नाही, हे व्हावेच लागेल कारण हिंदुत्वाचा विचार त्यामागे आहे. पंतप्रधान मोदींकडे उद्धव ठाकरेंना जावे लागण्याचा दिवस येणार आहे. लवकरच येणार आहे, राम मंदिर बांधल्यापासून एक वेगळे वातावरण आहे. अशा वातावरणात जर उद्धव ठाकरेंनाही वाटले की आपणही भाजपसह जावे तर त्यात गैर काही नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
महायुतीला 45 जागा मिळतील
आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले की, महायुतीला लोकसभा निवडणुकीत 45 जागा मिळतील असाही दावा शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीला काही दिवसच राहिले आहेत. इंडिया आघाडी देशात आणि महाविकास आघाडी राज्यात अशी विरोधकांची आघाडी आहे. त्या आघाडीत उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे पक्ष आणि काँग्रेस आहे. उद्धव ठाकरेंच्या प्रचारसभाही जोरात सुरु आहेत. त्यातच मविआमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम झालेली नसताना शहाजी बापू पाटील यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आले आहे.
ठाकरे पंतप्रधानांना भेटणार?
2019 मध्ये जेव्हा भाजपसह त्यांनी निवडणूक लढवली होती, त्या निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्यावरुन दोन्ही पक्षात टोकाचा संघर्ष झाला. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या समीकरणाची महाविकास आघाडी अस्तित्वात आली.यातच आज शहाजी पाटील म्हणाले की,उद्धव ठाकरे भाजपसह जातील आणि लवकरच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील.
Narendra Modi-Uddhav Thackeray will come together; Shahaji Patal’s statement is discussed across the state
महत्वाच्या बातम्या
- जुल्फीकार अली भुट्टो गेले जीवानिशी; 44 वर्षांनी पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाने चुकीची ठरवली फाशी!!
- जरांगेंचे आंदोलन + वंचितच्या सूचनांवर महाविकास आघाडीचे नेते गप्प; वंचितच्या नेत्याकडूनच आघाडीची बैठक “एक्सपोज”!!
- शहाजहान शेखला CBI कोठडी, वैद्यकीय तपासणीनंतर CIDच्या ताब्यात!
- खासदार नवनीत राणांना व्हॉट्सॲपवर जीवे मारण्याची धमकी!