विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा आज शपथविधी होणार आहे. संध्याकाळी 7.15 वाजता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदी सरकार 3.0 च्या शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. नियमांनुसार मंत्रिमंडळात 78 मंत्री असतात. आज 40 ते 45 मंत्रि शपथ घेण्याची शक्यता आहे. 543 सदस्य संख्या असलेल्या लोकसभेच्या नियमानुसार 78 मंत्री होऊ शकतात. त्यातल्या सुरवातीच 46 नावांची निश्चिती झाल्याची माहिती आहे. narendra modi oad ceremony new ministers in maharashtra
मंत्रिपदासाठी पीएमओ कार्यलयातून फोन गेले, त्यामध्ये महाराष्ट्रातल्या सुरुवातीच्या नावांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव, रामदास आठवले रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांची नावे आली आहेत. नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांची नावे मंत्रिमंडळात कायम आहेत. पण 2019 च्या मंत्रिमंडळात असलेले नारायण राणे आणि भागवत कराड यांची नावे या यादीत नाहीत.
त्याशिवाय टीडीपी, एलजेपी (आर) आणि जेडीयू या पक्षातील खासदारांना मंत्रिपदासाठी फोन गेला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात कोण कोणते खासदार असतील, हे पाहूयात.. आतापर्यंत 32 जणांची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव यांनाही फोन आला आहे. नितीन गडकरी आणि पियूष गोयल यांचीही वर्णी लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मंत्रिपद मिळणार नसल्याचे समोर आले.
मंत्रिपदाच्या शपथेसाठी फोन
१. जतीन राम मांझी, हिंदुस्थान आवाम मोर्चा
२. जयंत चौधरी, राष्ट्रीय लोकदल
३. अनुप्रिया पटेल, अपना दल
४. डी आर चंद्रशेखर, तेलगू देसम पार्टी
५. के. राम मोहन नायडू, तेलगू देसम पार्टी
६. नितीन गडकरी, भारतीय जनता पार्टी
७. राजनाथ सिंह, भारतीय जनता पार्टी
८. अमित शाह, भारतीय जनता पार्टी
९. अर्जुनराम मेघावाल, भारतीय जनता पार्टी
१०. राम नाथ ठाकुर, जनता दल युनायटेड
११. एच.डी.कुमारस्वामी, जनता दल सेक्युलर
१२. सुदेश महतो, ऑल झारखंड स्टुडंट्स युनिअन
१३. चिराग पासवान, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)
१४. मनसुख मांडविय, भारतीय जनता पार्टी
१५. पवन कल्याण, जनसेवा पार्टी (होल्ड)
१६. पियुष गोयल, भारतीय जनता पार्टी
१७. ज्योतिरादित्य शिंदे, भारतीय जनता पार्टी
१८. प्रतापराव जाधव, शिवसेना
१९. कमलजीत सेहरावत, भारतीय जनता पार्टी
२०. रक्षा खडसे, भारतीय जनता पार्टी
२१. रामदास आठवले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले
२२. के. अन्नामलाई, भारतीय जनता पार्टी (होल्ड)
२३. मनोहरलाल खट्टर, भाजप
२४. राव इंद्रजीत सिंह, भारतीय जनता पार्टी
२५. सुरेश गोपी, भारतीय जनता पार्टी
२६. ज्युएल ओरम, भारतीय जनता पार्टी
२८. मुरलीधर मोहोळ, भारतीय जनता पार्टी
२९. किशन रेड्डी, भारतीय जनता पार्टी
३०. बंदी संजय कुमार, भारतीय जनता पार्टी
३१. गिरिराज सिंह,भारतीय जनता पार्टी
३१. रवनीत बिट्टू,भारतीय जनता पार्टी
३२. निर्मला सीतारमन,भारतीय जनता पार्टी
३३. अन्नपूर्णा देवी,भारतीय जनता पार्टी
३४. सीआर पाटिल, भारतीय जनता पार्टी
३५. अजय टम्टा, भारतीय जनता पार्टी
३६. एस. जयशंकर, भारतीय जनता पार्टी
३७. जे. पी. नड्डा, भारतीय जनता पार्टी
३८. शिवराज सिंह चौहान, भारतीय जनता पार्टी
३९. पंकज चौधरी, भारतीय जनता पार्टी
४०. कमलेश पासवान, भारतीय जनता पार्टी
४१. सुधीर गुप्ता, भारतीय जनता पार्टी
४३. हरदीप सिंग पुरी, भारतीय जनता पार्टी
४४. सरबानंद सोनोवाल, भारतीय जनता पार्टी
४५. भुपेंद्र यादव,भारतीय जनता पार्टी
४६. प्रल्हाद जोशी, भारतीय जनता पार्टी
narendra modi oad ceremony new ministers in maharashtra
महत्वाच्या बातम्या
- CPP : काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी सोनिया गांधीच; पण लोकसभा विरोधी पक्ष नेतेपदी राहुल गांधींची निवड टळली!!
- “चौथा पक्ष” खोट्या नॅरेटिव्हला चोख प्रत्युत्तर नसणे हा संघ + भाजपचा राजकीय अनुवांशिक जुनाट दोष!!
- Modi 3.0 : मंत्र्यांची नावे आणि खाती अद्याप गुलदस्त्यातच, पण माध्यमांची पतंगबाजी सुरूच!!
- महाराष्ट्रात पुढील 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा; विदर्भाला यलो, सिंधुदुर्गाला रेड अलर्ट, मराठवाड्यातही मुसळधार पावसाची शक्यता