विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दक्षिण अमेरिकेतील चिली देशाचे राष्ट्रपती गॅब्रियल बोरिक यांचा आज राजधानीतल्या हैदराबाद हाऊस मध्ये हटके अंदाज दिसला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अशोक चक्र आणि तिरंग्याचा अर्थ समजावून घेतला.
कुठल्याही देशाचे राष्ट्रपती अथवा पंतप्रधान भारत दौऱ्यावर आले, तर भारताच्या पंतप्रधानांबरोबरच्या त्यांच्या वाटाघाटी हैदराबाद हाऊस मध्ये होत असतात. या राजशिष्टाचारानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिली राष्ट्रपती गॅब्रियल बोरिक यांचे हैदराबाद हाऊस मध्ये स्वागत केले. तिथे पारंपारिक फोटोसेशन झाले. त्यानंतर हैदराबाद हाऊसच्या कॉरिडोर मधून प्रत्यक्ष वाटाघाटींच्या मुख्य दालनात येताना राष्ट्रपती
गॅब्रियल बोरिक अचानक भारतीय ध्वजापाशी थांबले. तिथे त्यांनी अशोक चक्राकडे बोट दाखवले आणि त्या प्रतीकाचा अर्थ मोदींना विचारला. पंतप्रधान मोदींनी त्या प्रतीकाचा अर्थ नीट समजावून सांगितला. त्याचबरोबर राष्ट्रपती गॅब्रियल बोरिक यांनी तिरंगी ध्वजाचा अर्थही विचारला. तो देखील पंतप्रधान मोदींनी समजावून सांगितला.
पण सर्वसामान्यपणे हैदराबाद हाऊसच्या कॉरिडॉर मधून वाटाघाटींच्या मुख्य दालनाकडे येताना कुठलेही राष्ट्रपती किंवा पंतप्रधान असे मध्येच थांबून भारताच्या पंतप्रधानांना कुठला प्रश्न विचारत नाहीत. सर्वसाधारण अनौपचारिक चर्चा करतच ते कॉरिडॉर मधून दालनामध्ये दाखल होत असतात. पण चिली राष्ट्रपती गॅब्रियल बोरिक यांचा मात्र हैदराबाद हाऊसच्या कॉरिडॉरमध्येच हटके अंदाज दिसला आणि त्यांनी भारतीय ध्वजाचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून समजावून घेतला.
Narendra Modi meets Chile President Gabriel Boric at Hyderabad House in Delhi.
महत्वाच्या बातम्या
- Tamil Nadu तामिळनाडूमध्ये भाजप मोठ्या आघाडीच्या तयारीत!
- आधुनिक काळात कुटुंब व्यवस्था धोक्यात, ही राष्ट्रहिताच्या दृष्टीने धोक्याची घंटा; सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळेंचा इशारा!!
- Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये 17 नक्षली ठार; यात 11 महिला, कुख्यात कमांडरही मारला गेला
- Myanmar : म्यानमारमध्ये २४ तासांत १५ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले