विशेष प्रतिनिधी
जयपूर : राजस्थान, मध्य प्रदेश सह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर देशातले दोन बडे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वेगवेगळ्या एंगेजमेंट्स वाढल्या आहेत. narendra modi meets asian games champion and rahul gandhi meets girls student maharani college
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज एशियन गेम्स मधल्या पदक वीरांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. भारताने गेल्या 60 वर्षांमध्ये प्रथमच पदकांची शंभरी गाठली. 25 पेक्षा जास्त सुवर्णपदके मिळविली, याबद्दल पंतप्रधान मोदींनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. भारताला चीन मधल्या होंगजू एशियाड मध्ये एकूण 107 पदके मिळाली. या सर्व पदक वीरांचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. भविष्यकाळात भारतीय खेळाडूंना अनेक सरकारी सुविधा कोणत्याही अडथळ्याविना पुरविण्याचे आश्वासन दिले.
पंतप्रधान मोदी एशियाड वीरांना भेटत असताना दुसरीकडे राहुल गांधींनी जयपूरच्या दौऱ्यात महाराणी कॉलेजमध्ये तिथल्या मुलींना काही ब्युटी टिप्स दिल्या आणि स्वतःच्या चेहऱ्यावरच्या ग्लो चे सिक्रेट उलगडून सांगितले.
राहुल गांधींनी आज जयपूरच्या महाराणी कॉलेजमध्ये जाऊन तिथल्या लायब्ररीत विद्यार्थिनींशी गप्पा मारल्या. या विद्यार्थिनींनी राहुल गांधींना तुम्ही अजून लग्न का केले नाही??, तुमच्या स्मार्टनेसचे आणि चेहऱ्यावरच्या ग्लो चे सिक्रेट काय??, असे प्रश्न विचारले. राहुल गांधींनी या प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरे दिली. आपण वेगवेगळ्या कामांमध्ये आणि काँग्रेस पक्षाच्या कामांमध्ये एवढे गुंतलेलो आहोत की लग्नाचा विचार करायला आपल्याला वेळही नाही, असे ते म्हणाले.
त्याच वेळी त्यांनी आपण चेहऱ्यावर साबण किंवा कुठलेही क्रीम लावत नाही, तर फक्त साध्या पाण्याने चेहरा धुतो, हे सिक्रेटही जाहीर केले. आपल्याला कारलं, मटार आणि पालक चालत नाही. बाकी सगळे पदार्थ आपण आवडीने खातो, असेही ते म्हणाले. राहुल गांधींनी आपली सिक्रेट्स शेअर केल्याने महाराणी कॉलेजच्या विद्यार्थिनी खुश झाल्या.
narendra modi meets asian games champion and rahul gandhi meets girls student maharani college
महत्वाच्या बातम्या
- न्यूजक्लिकप्रकरणी प्रबीर-अमित यांच्या याचिकेवर HCचा निर्णय राखीव; UAPA अंतर्गत झाली अटक
- WATCH : चीननेच घडवली अतिरेकी निज्जरची हत्या, अमेरिकेतील मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या दाव्याने खळबळ
- छत्तीसगडसाठी भाजपने जाहीर केली उमेदवारांची दुसरी यादी; तीन खासदारांना तिकीट
- परळी वैजनाथ, घृष्णेश्वर, सप्तश्रृंगी गडासाठी शिंदे – फडणवीस सरकारचा 531 कोटींचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा!!