• Download App
    Narendra Modi नरेंद्र मोदी नावाच्या संघ स्वयंसेवक राज्यकर्त्याची पंचविशी!!

    नरेंद्र मोदी नावाच्या संघ स्वयंसेवक राज्यकर्त्याची पंचविशी!!

    संपूर्ण देशाची राजकीय कुस बदलून टाकणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीच्या वर्षात संघ स्वयंसेवक नरेंद्र मोदी नावाच्या राज्यकर्त्याची पंचविशी आली, याकडे कुठल्या प्रसारमाध्यमांचे फारसे लक्षही गेले नाही. सगळे संघाची शताब्दी साजरी करण्यात मग्न राहिले. मग ते संघाचे समर्थक असोत, की विरोधक असोत सगळ्यांनी संघाचे एकतर गोडवे गाईले किंवा जुन्याच मुद्द्यांनी संघावर टीकेची राळ उडविली, पण त्यापलीकडे जाऊन संघ स्वयंसेवक नरेंद्र मोदी नावाच्या राज्यकर्त्याने सरकार प्रमुख म्हणून 25 व्या वर्षांत पदार्पण केले, या महत्त्वाच्या मुद्द्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही स्वतः नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया अकाउंट वर आपल्या सरकार प्रमुख पदाने 25 व्या वर्षात आज पदार्पण केले असे लिहिल्यानंतर प्रसार माध्यमांना “जाग” आली आणि त्या सोशल मीडिया पोस्टच्या आधारे अनेकांनी मोदींच्या राज्यकर्ता भूमिकेची पंचविशी साजरी केली.

    – मोदी कायम सत्ताधारी बाकांवर, पण.‌‌..

    आपला DNA च विरोधकांचा आहे, अशी ज्या भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून नेत्यांपर्यंतची भावना आहे, त्या भाजपच्या सरकारांचे नेतृत्व नरेंद्र मोदींनी गेली 25 वर्षे केले. ते कधीही विरोधी बाकांवर बसले नाहीत. ते कायम सत्ताधारी बाकांवर बसले, इतकेच नाही तर ते कायम पहिल्या रांगेत पहिल्या खुर्चीवर बसले, तरी देखील भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंतचा आपला DNA विरोधकांचा असल्याचा न्यूनगंड अद्याप गेलेला नाही.

    – धाडसी ऐतिहासिक कामगिरीचे धनी

    पण त्याही पलीकडे जाऊन कोणीही प्रसार माध्यमांनी मोदींच्या राज्यकर्ता म्हणून नेतृत्वाचे मूल्यांकन केलेले आज तरी दिसले नाही. स्वतः मोदींनी सुद्धा राज्यकर्ता म्हणून फार मोठे आत्मचिंतन केल्याचे जाहीररित्या तरी लिहिले नाही. पण तरी देखील नरेंद्र मोदी नावाचे संघ स्वयंसेवक हे इतर पठडीबाज राज्यकर्त्यांपेक्षा वेगळे ठरले. त्यांनी अनेक ऐतिहासिक धाडसी निर्णय घेतले, हे सत्य मान्य करावे लागेल. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना नरेंद्र मोदींनी 25 वर्षे राज्य केले. ते सरकार प्रमुख म्हणून वावरले. पण त्यांच्यातले स्वयंसेवकत्व कधी दूर झाले नाही. विरोधकांनी त्यांच्यावर मौत का सौदागर किंवा चौकीदार चोर इथपर्यंतचे लांच्छन लावले‌. नरेंद्र मोदींनी सुद्धा तिखट प्रहार करून विरोधकांना नामोहरम केले. नामदार विरुद्ध कामदार अशा म्हणी वापरून घराणेशाही पक्षांना पराभूत केले, पण स्वतःतला सेवाभाव कधी दूर होऊ दिला नाही. राज्यकर्ता म्हणून ते बसलेली खुर्ची कधी स्वतःच्या डोक्यावर बसू दिली नाही. एरवी कुठल्याही राज्यकर्त्याला कठीण असलेली बाब नरेंद्र मोदींनी स्वयंसेवकत्वाच्या भूमिकेमुळे सहज साध्य करून घेतली.

    – aura निर्माण केला, पण…

    नरेंद्र मोदी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात स्वतःचा
    aura निर्माण करू शकले, हे खरे पण म्हणून ते अव्वल दर्जाचे राज्यकर्ते ठरले किंवा फार मोठे राजकीय मुत्सद्दी ठरले असे मान्य करणे मोदींच्या पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या टर्ममध्ये तरी कठीण आहे. कारण ते विरोधकांना खऱ्या अर्थाने वैचारिक दृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या नामोहरम शकले नाहीत. किंबहुना अद्दल घडवू शकले नाहीत. गांधी परिवार आणि घराणेशाहीतली काही नेते ही त्यांची उदाहरणे उघड दिसत आहेत. नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी दगा दिला, तो मोदींना वेळीच ओळखता आला नाही.

    – तिसऱ्या टर्ममध्ये सर्वांत मोठी आव्हाने

    सध्याच्या आंतरराष्ट्रीय राजकारणात तर मोदींसमोरची आव्हाने सर्वांत मोठी आहेत. त्या आव्हानांना सामोरे जाण्यात मोदी कधी कचरले नाहीत हे खरे, पण म्हणून त्यांनी आव्हानांवर 100% मात केली, असेही म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. उलट मोदी सलग 25 वर्षे राज्यकर्ता बनून राहिले, तरी ते स्वतःचा आणि स्वतःच्या संघटनेचा विशिष्ट nationalists narrative संपूर्ण देशभरात रुजवू शकले नाहीत आणि विरोधकांच्या fake narrative वर पूर्णपणे मात करू शकले नाहीत, असे म्हणण्यासारखी मात्र परिस्थिती निश्चित आहे. अन्यथा मोदींच्या 25 वर्षांच्या राज्यकर्ता कारकिर्दीत विरोधकांचा अजेंडा वेगळ्या पद्धतीने मान्य करावा लागण्याची त्यांना गरज पडली नसती. उलट राज्यकर्ता म्हणून स्वतःचा आणि स्वतःच्या संघटनेचा विशिष्ट narrative ते प्रस्थापित करू शकले असते, तर विरोधकांची त्यांच्यामागे आणि त्यांच्या narrative मागे फरफट झालेली दिसली असती. पण आज तरी तसेच चित्र दिसत नाही. पण त्यामुळे नरेंद्र मोदींच्या राज्यकर्ता म्हणून मोठ्या achievements झाकता येणार नाहीत.

    Narendra Modi enters 25 th year as head of the government

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    MP Satnam Sandhu : खासदार सतनाम यांचे परराष्ट्र मंत्रालयाला पत्र- रशिया-युक्रेन युद्धात भारतीयांना जबरदस्ती ढकलले जात आहे, पंजाबी तरुण अडकले

    Supreme Court : अनक्लेम्ड मालमत्तेसाठी केंद्रीकृत डिजिटल प्लॅटफॉर्मची मागणी; सर्वोच्च न्यायालयाने सरकार आणि आरबीआयकडून मागितले उत्तर

    Ola Electric : ओला इलेक्ट्रिककडून दुर्मिळ पृथ्वी धातूंशिवाय मोटर विकसित; पहिल्या फेराइट मोटरला सरकारची मंजुरी; चीनवरील अवलंबित्व कमी होणार