वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल मधल्या संदेशखालीत तृणमूल काँग्रेसचा गुंड माफिया नेता शेख शहाजहान यांनी केलेले अत्याचार महिलांवर केलेले सामूहिक बलात्कार संपूर्ण देशभरात निंदेचा विषय ठरले. शहाजहान शेखच्या केंद्रीय तपास संस्थांनी शहाजहान शेखच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या साथीदारांनाही अटक केली. Narendra Modi called Rekha Patra, a BJP candidate from Basirhat and one of the Sandeshkhali victims
पण भाजपने त्या पलीकडे जाऊन संदेशखाली मधील अत्याचार पीडित महिला रेखा पात्रा यांना भाजपचे तिकीट देऊन बशीरहाट लोकसभा मतदारसंघात उभे केले आहे. पश्चिम बंगाल मधल्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या संचाने त्यांच्या प्रचाराची जबाबदारी घेतली आहे. आज रेखा पात्रा आत्मविश्वासाने प्रचारात मग्न आहेत. त्यातच त्यांना आज एक सरप्राईज मिळाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रेखा पात्रा यांना फोन करून लोकसभा निवडणुकीतील प्रचारा संदर्भात मार्गदर्शन केले. त्यांच्याकडून प्रचार मोहिमेची सगळी माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर तिथल्या काही स्थानिक कार्यकर्त्यांशी देखील पंतप्रधान मोदींनी संवाद साधला.
बशीरहाट लोकसभा मतदारसंघासारख्या भाजपला राजकीय दृष्ट्या प्रतिकूल असणाऱ्या मतदारसंघात एका अत्याचार पीडित महिलेला पक्षाची उमेदवारी देऊन थेट लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवणे हे धाडस भाजपने दाखविले आणि त्या धाडसापाठोपाठ कार्यकर्त्यांचे मोठे बळ देखील त्या महिलेच्या पाठीशी उभे केले. त्यामुळे बशीरहाट मधली लोकसभा निवडणुकीची लढत अतिशय चुरशीची आणि रंजक झाली आहे. त्याचबरोबर रेखा पात्रा यांना पंतप्रधान मोदींनी स्वतः फोन करून प्रचाराविषयी मार्गदर्शन केल्याने त्यांच्या आत्मविश्वासात भर पडली आहे.
Narendra Modi called Rekha Patra, a BJP candidate from Basirhat and one of the Sandeshkhali victims
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींनी मॉस्को दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध, रशियाला सहकार्याचे दिले आश्वासन
- केमिकल फॅक्टरीला भीषण आग, बॉयलरचा स्फोट होऊन ५ कामगारांचा मृत्यू
- काँग्रेसने 46 उमेदवारांची चौथी यादी केली जाहीर, महाराष्ट्रातील केवळ चार जागांचा समावेश!
- बँक खाती गोठवल्या प्रकरणी ‘…तर ही परिस्थिती उद्भवली नसती’ म्हणत संबित पात्राचा काँग्रेसला टोला