विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव ( Narasimha Rao) यांचे गृहराज्य तेलंगणात राजीव गांधींच्या पुतळ्याचे अनावरण संपूर्ण हिंदू धार्मिक विधी विधानात!!, असे आज घडले.
तेलंगणात ज्यावेळी भारत राष्ट्र समिती पक्षाचे के. चंद्रशेखर राव यांचे सरकार होते, त्यावेळी त्या सरकारने “तेलुगु बिड्डा” म्हणजे “तेलुगु पुत्र” पी. व्ही. नरसिंह राव यांची जन्मशताब्दी जोरात साजरी करून नरसिंह राव यांचा आर्थिक सुधारणांचा राजकीय वारसा संपूर्ण जगासमोर आणला होता. नरसिंह राव काँग्रेसचे पंतप्रधान होते म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची चंद्रशेखर राव यांची प्रवृत्ती नव्हती.
आज त्याच तेलंगणात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर तिथले मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी हैदराबाद मध्ये राजीव गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी त्यांनी पुरोहितांना बोलवून संपूर्ण हिंदू धार्मिक विधी करून राजीव गांधींच्या पुतळ्याची आरती आणि पूजाअर्चा केली.
एरवी गांधी परिवारातले सदस्य फारसे हिंदू धार्मिक विधी विधानांमध्ये आस्था दाखवत नाहीत. परंतु कुठल्याही निवडणुका जवळ आल्या की “टेम्पल रन” सारखे विषय पुढे आणून गांधी परिवार सॉफ्ट हिंदुत्वाची लाईन पकडतो. याचेच अनुकरण मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी करून राजीव गांधींच्या पुतळा अनावरणात हिंदू धार्मिक विधी विधान पार पाडले.
Narasimha Rao’s home state Telangana, Rajiv Gandhi’s statue is unveiled in a Hindu ritual statement!
महत्वाच्या बातम्या
- Assam Congress : आसाम काँग्रेसने आमदारांसह पाच नेत्यांना नोटीस पाठवली
- Narendra Modi : मोदींचा उद्यापासून तीन राज्यांचा दौरा, देशाला मिळणार पहिली वंदे मेट्रो रेल्वे
- JP Nadda : जेपी नड्डा यांनी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र भाजपला केले सावध
- Ladki Bahin Yojna Superhit : बहिणींच्या डोळ्यातील आनंद सांगतो; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘सुपरहिट’-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे