वृत्तसंस्था
पणजी : गोव्याची राजधानी पणजी मध्ये आज नरक चतुर्दशी निमित्त नरकारसुर दहन करण्यात आले. हजारो नागरिक या कार्यक्रमात एकत्र आले आणि त्यांनी नरकासुराच्या 36 फुटी प्रतिमेचे दहन केले. एरवी दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाच्या बातम्या येत असतात. परंतु पणजी मध्ये नरकासुर दहन होते यावेळी नरकासुराची प्रतिमा जाळण्यात आली. Narakasur Dahan in Goa; Darshan of Ramlalla in Ayodhya
अयोध्या मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नरक चतुर्दशी निमित्त सकाळी श्री रामलल्लांचे दर्शन घेतले आणि आरती केली. त्याचबरोबर त्यांनी हनुमान गढी येथे जाऊन पूजा अर्चना केली. उज्जैन मधील महाकाल मंदिरात आज विशेष रुद्र पूजेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरात दिवाळीचा उत्साह द्विगुणित झाला असताना विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.
Narakasur Dahan in Goa; Darshan of Ramlalla in Ayodhya
महत्वाच्या बातम्या
- गोव्यात नरकासुर दहन; अयोध्येत रामलल्लांचे दर्शन; उज्जैन मध्ये महाकाल पूजन
- कर्नाटकातही हलाल विरोधात आंदोलन जोरावर; हिंदू उतरले रस्त्यावर!!
- उद्धव ठाकरे यांच्या आजच्या मराठवाडा दौऱ्यापूर्वी आणि दौऱ्यानंतर राजकारण बेरजेचं की वजाबाकीचं?
- ऐतिहासिक ताजमहाल होणार अतिक्रमण मुक्त; सीमेअंतर्गत 500 मीटर व्यवसाय बंदी करणार लागू