• Download App
    दशामाता मूर्तींच्या रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात नंदुरबार उत्सवासाठी सज्ज , मूर्तिकार कामात मग्न|Nandurbar Is Ready for Dashamata festival; Dashamata idols Are In the final stages of work

    दशामाता मूर्तींच्या रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात नंदुरबार उत्सवासाठी सज्ज , मूर्तिकार कामात मग्न

    विशेष प्रतिनिधी

    नंदुरबार : दशामातेची मूर्ती साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यावर्षी रंगांच्या व इतर वस्तूच्या किमती वाढल्याने मूर्तिकारांनी नाराजी व्यक्त केली. परंतु, लहान मोठ्या मूर्तींचे दर स्थिर ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली.Nandurbar Is Ready for Dashamata festival; Dashamata idols Are In the final stages of work

    दशामातेच्या उत्सव हा मूळचा गुजरात राज्यातील आहे. नंदुरबार जिल्हा सीमावर्ती भाग आहे. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षांपासून उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. येत्या ८ ऑगस्टला मातेची स्थापना करण्यात येत आहे. त्यामुळे कारागिरांनी मुर्ती तयार करण्याच्या कामाला वेग दिला आहे.



    शहरात तीन ते चार कारागिरांकडून मुर्ती बनविण्याचे काम सुरू आहे. कारागिर परेश सोनार व सागर सोनार यांनी गेल्या ६ महिन्यापासून मूर्ती बनवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांच्याकडे एक फुटापासून ते साडेफुटापर्यंत मूर्ती आहेत. अगदी १००रुपयांपासन ते ५ हजार रुपयांपर्यंत मूर्तीची किंमत आहे.

    परंतु कोरोनाचे सावट असल्याने ग्राहकांकडून मागणी मंदावलेली आहे. गुजरात व मध्यप्रदेशातून देखील मुर्ती खरेदीसाठी भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. परंतु दोन वर्षापासून तेथील भाविक येत नसल्याने ५० टक्के बुकिंग झाले आहे, असे मूर्तिकार सागर सोनार यांनी सांगितले.

    • दशामाता मूर्तींच्या रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात
    • दशामातेचा उत्सव हा मूळचा गुजरात राज्यातील
    • नंदुरबार परिसरात पंधरा वर्षांपासून उत्सवाची परंपरा
    • येत्या ८ ऑगस्टला मातेची स्थापना होणार आहे.
    • लहान, मोठ्या मूर्तींच्या रंगरांगोटीचे काम वेगाने
    • गेल्या ६ महिन्यापासून मूर्ती बनवण्याचे काम सुरु

    Nandurbar Is Ready for Dashamata festival; Dashamata idols Are In the final stages of work

     

    Related posts

    Air India : एअर इंडियाने जारी केली अ‍ॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द

    Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी

    Operation Sindoor : पाकिस्तानला आत घुसून मारणार, बचावाची एकही संधी नाही देणार; आदमपूर हवाई तळावरून मोदींची गर्जना!!