२० तासात अंतर पूर्ण करण्याची मुभा असतांना १८ तासात ३०० किलोमीटर अंतर या दोघांनी पूर्ण केले.Nanded: Iodex India’s Pollution Awareness Message in Record Time; 300 km Kelly cycling
विशेष प्रतिनिधी
नांदेड : सायकलिंगमध्ये राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत नावलौकिक असणारे नांदेड पोलीस विभागाचे पोलीस नाईक संतोष सोनसळे व त्यांचे मित्र हेमंत बेले यांनी नांदेड ते निजामाबाद व परत निजामाबाद ते नांदेड अशी ३०० किलोमीटर अंतर सायकलिंग केली आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी विक्रमी वेळेत अयोडेक्स इंडियाच्या प्रदूषण जनजागृतीचा संदेश दिला.या दोघांनी पोलिस दलाचे नाव लौकिक केले.
नांदेड क्लब येथून ३०० किलोमीटर अंतराची सायकलिंगची सुरवात केली. नरसी नायगाव, बिलोली, बोधन, निजामाबाद व डिचपल्लीपर्यंत दीडशे किलोमीटर जाणे व येणे अंतर यशस्वीरित्या पूर्ण केले. २० तासात अंतर पूर्ण करण्याची मुभा असतांना १८ तासात ३०० किलोमीटर अंतर या दोघांनी पूर्ण केले.
संतोष व हेमंत यांच्या या घवघवीत यशाबद्धल नांदेड परीक्षेत्राचे पोलिस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, निलेश मोरे, तसेच पोलिस उप अधीक्षक (गृह) अर्चना पाटील, राखीव पोलिस निरिक्षक विजय धोंडगे आदींनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Nanded: Iodex India’s Pollution Awareness Message in Record Time; 300 km Kelly cycling
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राला 51 ‘पोलीस पदके, इथे वाचा संपूर्ण यादी
- MUMBAI : मंत्रालयाच्या मुख्य गेटवर SRPF जवनाने स्वतःवर झाडली गोळी , उपचारादरम्यान मृत्यू
- मोठी बातमी : जालन्यातील शेतकऱ्यांचा अजित पवार, शिवसेनेच्या खोतकरांवर गंभीर आरोप, साखर कारखान्यातून अन्नदात्याची घोर फसवणूक
- Budget 2022 : खप वाढवण्यासाठी सरकारने नोकरदार-गरिबांना मदत करावी, कोरोना काळात फटका बसलेल्या रिटेल क्षेत्राची अर्थमंत्र्यांकडे मागणी