• Download App
    राजीव गांधी नामकरण आणि नामांतर; पिंपरीतल्या नियोजित विज्ञान नगरीस नाव, तर आसाममध्ये ओरांग नॅशनल पार्कमधून नाव हटविले|Naming and Renaming row; new science park in PCMC in the name of Rajiv Gandhi and assam govt removed his name from orang nation park

    राजीव गांधी नामकरण आणि नामांतर; पिंपरीतल्या नियोजित विज्ञान नगरीस नाव, तर आसाममध्ये ओरांग नॅशनल पार्कमधून नाव हटविले

    प्रतिनिधी

    नाशिक – राजीव गांधी नामकरण आणि नामांतराववरून देशात वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारने पिंपरी – चिंचवडमधील नियोजित विज्ञान नगरीस राजीव गांधींचे नाव देण्याचे जाहीर केले आहे, तर तिकडे आसाममध्ये ओरांग नॅशनल पार्कच्या नावातून राजीव गांधी यांचे नाव हटविण्यात आले आहे.Naming and Renaming row; new science park in PCMC in the name of Rajiv Gandhi and assam govt removed his name from orang nation park

    पिंपरी – चिंचवड येथे आठ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यापैकी एक एकर जागेत यापूर्वी तेथे विभागीय पातळीचे विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहे. उर्वरित सात एकर जागेवर जागतिक दर्जाची,



    विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारित भारतरत्न राजीव गांधी विज्ञान आविष्कार नगरी पुढील पाच वर्षांत उभारण्यात येणार आहे. सात एकरांवर ही विज्ञान नगरी उभारली जाणार असून, त्यासाठी लागणाऱ्या १९१ कोटी रुपयांच्या खर्चासही ठाकरे मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

    आसाममध्ये ओरांग नॅशनल पार्कच्या नावातून राजीव गांधी यांचे नाव हेमंत विश्वशर्मा यांच्या भाजप सरकारने हटविले आहे. त्यावर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी मुर्खपणा हा शब्द वापरून टीका केली आहे. ओरांग नॅशनल पार्क १९८५ मध्ये स्थापन करण्यात आले.

    तेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते. आसाममध्ये हितेश्वर सैकिया हे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. त्यांनी आग्रहाने ओरांग नॅशनल पार्कला राजीव गांधींचे नाव दिले होते. मात्र, ते नाव आता हटविण्यात आले आहे.

    Naming and Renaming row; new science park in PCMC in the name of Rajiv Gandhi and assam govt removed his name from orang nation park

    Related posts

    Center Reports : केंद्राने म्हटले- अमेरिकेत 5 मंदिरांची तोडफोड; बांगलादेशात 5 वर्षांत हिंदूंवर 3582 हल्ले, पाकिस्तानात अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसेच्या 334 घटना

    Air Force Chief : ऑपरेशन सिंदूरवर हवाई दल प्रमुख म्हणाले- 5 पाकिस्तानी विमाने पाडली; शत्रूचे मोठे नुकसान

    India Defense भारताचे संरक्षण उत्पादन विक्रमी उंचीवर; 2024-25 मध्ये 1.51 लाख कोटींचा नवा टप्पा